

देवळा : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू झाल्याने देवळा पोलीस ठाण्यात एका आरोपी विरोधात अट्रोसिटी कायद्यान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील विजयनगर येथे दिनकर वाघ यांच्या घरासमोर देविदास निकम यांचे भांडण चालू असतांना घटनास्थळी श्रावणशिवाजी वाघ हे सदर भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्याचा निलेश सूर्यवंशी रा विजयनगर ता देवळा यांना राग आल्याने त्यांनी श्रावण वाघ (४८) यांची गच्ची धरून त्यांना जमिनीवर ढकलून दिल्याने यात वाघ यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेबाबत दगूबाई वाघ यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने आरोपी निलेश सूर्यवंशी यांच्या विरोधात अट्रोसिटी कायद्यान्वे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते करीत आहेत.