Deola APMC | व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान: नगरसेवक संतोष शिंदे
Nashik onion farmer protest
देवळा : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या गंभीर आरोप शेतकरी तसेच नगरसेवक संतोष शिंदे यांनी केला. याची सभापती योगेश आहेर यांनी दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
याबाबत शेतकरी संतोष शिंदे यांनी सांगितले की , खरीप हंगामाच्या तोंडावर बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. देवळा बाजार समिती मध्ये देखील आवक वाढली असून, तुलनेत बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा फायदा व्यापारी वर्ग घेत असून चांगल्या प्रतीच्या कांद्याला देखील कवडीमोल भाव मिळत असल्याने ही एक प्रकारे शेतकऱ्यांची लूटमार होत असल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
याची बाजार समितीच्या सभापती व संचालक मंडळाने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा , दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढत असून, याठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात खरेदीदार व्यापारी नाहीत . यामुळे बाजार समितीने व्यापारी वाढवावेत. भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे . तसेच बाजार समिती मार्फत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असलेल्या बाजार भावाप्रमाणे सरासरी खरेदी होताना दिसून येत नसल्याचे सांगितले जाते . याची दखल घ्यावी.
शुक्रवारी (दि.१८) देवळा बाजार समितीचा उन्हाळी कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे
कमीत कमी 300 जास्तीत जास्त 1500 सरासरी 1400
1 नं :- 1400/1500
2 नं :- 1300/1400
3 नं :- 1000/1300
गोल्टी/गोल्टा :-300/1100
खाद / चोपडा: -300/850

