Nashik | नाशिकमध्ये डेंग्यूचा उद्रेक, गाेविंदनगरमध्ये एकाचा मृत्यू

नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर, महिनाभरात दुसरा बळी
Dengue
डेंग्यू प्राणघातक आहेPudhari News Network
Published on
Updated on

सिडको (नाशिक) : पुढारी ऑनलाइन डेस्क

सिडको प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंदनगर येथे आज गुरुवारी (दि. ४) रोजी डेंग्युने ५८ वर्षीय एकाचा मृत्यू झाला आहे. महिनाभरात दुसरी घटना घडली आहे.

Summary

जून महिन्यात डेंग्यूचे विक्रमी १६१ बाधित रुग्ण आढळले आहेत तर डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा २७१ वर गेला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात गोविंदनगरमधील ५० वर्षी व्यक्तीचा डेंग्यूसदृश आजारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी गंगापूर रोडवरील २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू डेंग्यूसदृश आजारामुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर आता परत गोविंदनगरमध्येच डेंग्युमुळे ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर जानेवारीपासून आतापर्यत शहरात तब्बल २७१ डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

Dengue
नाशिक : डेंग्यू डासांचे ठिकाण सापडल्यास दहा हजारांचा दंड

डेंग्यू रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सामाजिक कार्यकर्ते सागर मोटकरी यांनी सिडको भागात फवारणी करण्याची मागणी केली आहे.

घरोघरी तपासणी मोहीम सुरुच

गेल्या सहा महिन्यांतच शहरातील डेंग्यू बाधितांचा आकडा २७१वर पोहोचला आहे. त्यामुळे महापालिकेने डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी वैद्यकीय विभागांतर्गत मलेरिया पथकांमार्फत घरोघरी भेटी देऊन पाणीसाठ्यांची तपासणी सुरू केली आहे. डेंग्यू डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या १३० नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. डेंग्यूच्या अळ्या आढळणाऱ्यांविरोधात थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news