Dengue Outbreak | हातकणंगले तालुक्यातील धरणग्रस्त दुर्गेवाडीत डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Dengue Outbreak | हातकणंगले तालुक्यातील धरणग्रस्त दुर्गेवाडी येथे सध्या डेंग्यूचा फैलाव वाढत असून डेंग्यूचे रुग्ण वेगवेगळ्या भागात आढळून लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
Dengue Cases
Dengue CasesDengue Cases
Published on: 
Updated on: 

कुंभोज : पुढारी वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील धरणग्रस्त दुर्गेवाडी येथे सध्या डेंग्यूचा फैलाव वाढत असून डेंग्यूचे रुग्ण वेगवेगळ्या भागात आढळून लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ज्या रूग्णांची रक्ताची चाचणी घेतली गेली आहे, त्यांचे डेंग्यू पॉझिटिव्ह अहवाल येत आहेत. धरणग्रस्त येथे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत; मात्र रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही.

Dengue Cases
Leopard Sighting Hatkanangale | कुंभोज येथे पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण

गावात डेंग्यूसदृश काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग कामाला लागला आहे. आरोग्य विभागामार्फत युद्धपातळीवर दररोज सर्वेक्षणचे काम सुरू आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढत असून त्यातील काही रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत; मात्र ही साखळी अजूनही तुटताना दिसत नाही.

डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण सर्वच भागात आढळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून धरणग्रस्त दुर्गेवाडीमधील नागरिकांना ताप, थंडी येत असून प्लेटलेट कमी झाल्या आहेत.
धरणग्रस्त दुर्गेवाडी ग्रामपंचायतीने गटारीची स्वच्छता, धूर फवारणी केली नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीका होत आहे;

Dengue Cases
Leopard Sighting Hatkanangale | कुंभोज येथे पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण

परंतु आरोग्य विभागातर्फे डेंग्यू तापासंदर्भत जनजनजागृती सुरू केली आहे. गावात डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्यांची संख्या वाढत आहे. ताप, मळमळ, उल्टी येणे, अंगदुखी, सांधेदुखी आदींनी रुग्ण बेजार झाले आहेत. त्यामुळे धरणग्रस्त दुर्गेवाडी ग्रामपंचायतीकडून तुंबलेल्या गटारीभोवती बी.एस.सी. पावडर टाकण्यात यावी, अनावश्यक वस्तू यांची योग्य विल्हेवाट लावली जावी, खबरदारीसाठी वाहनाद्वारे जनजागृती करावी, ताबडतोब धूर फवारणी व गटारीची स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

डेंग्यू प्रतिबंध ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपले घर, परिसर स्वच्छ व डासमुक्त ठेवण्याचा संकल्प करून नागरिकांच्या सहकार्याने डेंग्यू व इतर कीटकीय आजारांचा प्रसार निश्चितपणे रोकता येईल.

— डॉ. सत्यजित तोरस्कर, समुदाय आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news