Shalarth ID Scam | "बनावट शालार्थ आयडी घोटाळा! सहसचिव दीपक गरुडला 3 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी"

Shalarth ID Scam | शालार्थ घोटाळा ; गरुडला ३ ऑगस्टपर्यंत कोठडी आरोपींना आश्रय देणाऱ्या तिघांचा गुन्ह्यात समावेश
Shalarth ID Scam
Shalarth ID ScamPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात गाजत असलेल्या बनावट शालार्थ आदेश घोटाळ्यात शैक्षणिक संस्थेचा सहसचिव दीपक काशीनाथ गरुड यास तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तसेच त्याच्यासह तिघांना ताब्यात घेतलेल्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या चौघांना संजय गरुड यास आश्रय देणाऱ्या आरोपाखाली जळगाव जिल्ह्यातील शिरपूर येथे २९ जुलैला ताब्यात घेण्यात आले होते.

Shalarth ID Scam
Ozar Flyover Repair | "ओझरला उड्डाणपूल दुरुस्ती, सात दिवस नाशिक लेन बंद! धोकादायक भगदाडामुळे एकेरी वाहतूक व्यवस्था"

नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याच्या तपासात ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली असून, आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आणि इतर संबंधितांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात आतापर्यंत सुमारे १२-०० आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

तब्बल ८४९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने कोणतीही वैधमान्यता किंवा शालार्थ प्रस्ताव नसताना बनावट वैयक्तिक मान्यता आदेश आणि बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या बनावट आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीमध्ये माहिती भरून वेतन व थकबाकीची रक्कम काढण्यात आली. या प्रकारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.

अटक करण्यात आलेला दीपक गरुड (वय ५२, रा. पारसनगर, शेंदुर्णी, ता. जामनेर, जि. जळगाव) हा एका शैक्षणिक संस्थेचा सहसचिव असून, त्याने इतर आरोपींसोबत संगनमत करून १५ शैक्षणिक संस्थांमधील १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट वैयक्तिक मान्यता आदेश आणि बनावट शालार्थ आदेश तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून तयार करण्यात आल्याचे भासविले होते.

दीपक गरुडचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक सातत्याने प्रयत्न करत होते. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी शिरपूर (जि. धुळे) येथे आपल्या साथीदारांसह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान सोपान सुपडू बारी (५२, रा. शेंदुर्णी), पंकज माधवराव चव्हाण (४२, रा. रांजणगाव, ता. चाळीसगाव) आणि राजवीर दीपक गरुड (१८, रा. पारसनगर, शेंदुर्णी) यांनी मुख्य आरोपीला अटक टाळण्यासाठी आश्रय दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.

Shalarth ID Scam
Mumbai - Nashik Highway | मुंबई नाशिक महामार्ग गेला खड्यात : रस्त्याची झाली चाळण, तरी टोल वसुली जोरात!

आरोपी दीपक गरुडला न्यायालयात हजर केले असता ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके आणि गुन्हे शाखेचे पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news