Ramdas Athawale | 2027 जातीय जनगणनेनंतरच उपवर्गीकरणाचा निर्णय घ्या

Ramdas Athawale | केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
Ramdas Athawale
Ramdas Athawalepudhari photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मातंग समाजावर अन्याय झाला ही खरी परिस्थिती असली तरी २०२७ च्या जातीय जनगणनेचे आकडे समोर आल्यानंतरच उपवर्गीकरणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाावा, जेणेकरून कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांनी केली. याबरोबरच राज्यातील दुष्काळ, मराठा आरक्षण या विषयावर त्यांनी भाष्य केले.

Ramdas Athawale
Nashik Mahila Shetkari | नाशिक जिल्ह्यात महिला शेतकऱ्यांचा डंका! 'सक्षमीकरण' योजनेत 76 हजारांहून अधिक नोंदणी पूर्ण

मंत्री आठवले यांनी गुरुवारी (दि. १) येथील शासकीय विश्रामगृहावर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मंत्री आठवले म्हणाले की, आरक्षणाचा लाभ बौद्ध समाजाला झाला आहे. मातंग माध्यमातून उपवर्गीकरणाची मागणी होत आहे. मात्र, याबाबत निर्णय घेताना २०२७ च्या जातीय जनगणनेचे आकडे समोर आल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जावा.

राहुल गांधी आता जातीय जनगणनेची भाषा करत आहेत, परंतु ही आमची जुनीच मागणी होती, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करून बळीराजाला आणि शेतमजुरांना थेट आर्थिक मदत पुरवावी. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे वीजबिल पूर्णपणे माफ करण्यात यावे.

कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा, राज्यात आरपीआयला सत्तेत योग्य वाटा मिळत नसून पक्षाला दोन महामंडळे आणि किमान एक आमदारकी मिळालीच पाहिजे, अशा स्पष्ट शब्दांत आठवले यांनी महायुतीतील मित्रपक्षांना घरचा आहेर दिला. यासोबतच, २०२९ मध्ये नरेंद्र मोदी चौथ्यांदा पंतप्रधान होतील आणि मी सुद्धा पुन्हा केंद्रीय मंत्री बनेन, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येकाचा राजीनामा मागणे योग्य नाही:

ठाकरे बंधूंना पूर्वी मोर्चा काढायची सवय नव्हती, आता ती लागली आहे; मात्र, अशा मोर्चाचा राजकीयदृष्ट्या काहीही फायदा होणार नाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा मागणे योग्य नाही. ईव्हीएम काँग्रेसच्या काळातच आले असून, बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तरी आमची काहीच अडचण नाही, असेही त्यांनी सांगितले.

Ramdas Athawale
Shalarth ID Scam | नाशिक शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी घडामोड! संस्थाचालक शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाकडून फेटाळला

मराठ्यांना ओबीसींतून आरक्षणाला विरोध:

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, मराठा समाजाला सरसकट 'ओबीसी'तून आरक्षण देण्याच्या मागणीला आमचा स्पष्ट विरोध आहे. मराठा समाजाने उर्वरित १० टक्के आरक्षणातून किंवा सारथी आणि इतर योजनांद्वारे लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नाशिक विमानतळाला दादासाहेबांचे नाव द्यावे:

नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे, ही आमची पहिली आणि प्रमुख मागणी आहे. 'जटायू' नामांतराला आमचा विरोध नाही, मात्र दादासाहेब गायकवाड यांचे योगदान मोठे आहे त्यामुळे त्यांचेच नाव द्यावे, अशी आग्रही मागणीही आठवले यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news