

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या साधू-महंतांच्या बैठकीत जाहीर करण्यात आल्या असून, 31 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक आणि त्र्यंबक येथे ध्वजारोहण होणार आहे.
पहिले अमृतस्नान 2 ऑगस्ट, दुसरे 31 ऑगस्ट, तर तिसरे 11 सप्टेंबर 2027 रोजी होणार आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वर येथे 23, तर नाशिक येथे 43 पर्वस्नान पार पडतील. एकूण 22 महिने चालणाऱ्या सिंहस्थाची 24 जुलै 2028 रोजी अखेरच्या पर्वस्नानाने समाप्ती होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 13 प्रमुख आखाड्यांच्या साधू-महंतांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (दि.1 जून) पार पडली. यावेळी श्री गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ आणि अखिल भारतीय वैष्णव आखाडा परिषद यांच्याकडून निश्चित करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. सिंहस्थ पर्वाचा प्रारंभ 31 ऑक्टोबर 2026 रोजी रामकुंड पंचवटी येथे साधू-महंतांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने होईल.
31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12.02 वा.
ठिकाण : रामकुंड, पंचवटी, नाशिक
सिंहस्थ कुंभादरम्यान नाशिक येथे साधुग्राम ध्वजारोहण अर्थात आखाडा ध्वजारोहण शनिवार 24 जुलै 2027 रोजी पार पडेल, तर नगरप्रदक्षिणा गुरुवारी 29 जुलै 2027 रोजी पार पडेल. सिंहस्थात एकूण 3 अमृतस्नानांचा योग असणार आहे. प्रथम अमृतस्नान आषाढ महिन्यातील सोमवती अमावस्येला सोमवारी 2 ऑगस्ट 2027 रोजी, तर दुसरे महाकुंभस्नान श्रावण महिन्यातील अमावस्येला मंगळवारी 31 ऑगस्ट 2027 रोजी पार पडेल. तृतीय अमृतस्नान भाद्रपद महिन्यातील एकादशीला शनिवारी 11 सप्टेंबर 2027 रोजी संपन्न होईल. सिंहस्थात विशेष पर्वस्नान गुरुवारी 12 ऑगस्ट 2027, मंगळवारी 17 ऑगस्ट 2027 आणि शनिवार 28 ऑगस्ट 2027 ला संपन्न होईल. सिंहस्थात एकूण 43 पर्वस्नान पार पडणार आहेत.
सोमवारी 2 ऑगस्ट 2027
आषाढ, सोमवती अमावस्या
मंगळवारी 31 ऑगस्ट 2027
श्रावण, अमावस्या
शनिवारी 11 सप्टेंबर 2027, भाद्रपद, शुद्ध एकादशी
गुरुवार 12 ऑगस्ट 2027 श्रावण, शुद्ध एकादशी
मंगळवारी 17 ऑगस्ट 2027 श्रावण, शुद्ध पौर्णिमा
शनिवारी 28 ऑगस्ट 2027 श्रावण, कृ. एकादशी
5 सप्टेंबर 2027 ऋषिपंचमी
11 सप्टेंबर 2027 भाद्रपद शुद्ध एकादशी
15 सप्टेंबर 2027 भाद्रपद शुद्ध पौर्णिमा
26 सप्टेंबर 2027 भाद्रपद कृष्ण एकादशी
30 सप्टेंबर 2027 भाद्रपद कृष्ण अमावस्या
11 ऑक्टोबर 2027 आश्विन शुद्ध एकादशी
15 ऑक्टोबर 2027 आश्विन शुद्ध पौर्णिमा
25 ऑक्टोबर 2027 आश्विन वद्य एकादशी
10 नोव्हेंबर 2027 कार्तिक शुद्ध एकादशी
14 नोव्हेंबर 2027 कार्तिक शुद्ध पौर्णिमा
24 नोव्हेंबर 2027 कार्तिक वद्य एकादशी
28 सप्टेंबर 2027 कार्तिक वद्य अमावस्या
9 डिसेंबर 2027 मार्गशीर्ष शुद्ध एकादशी
13 डिसेंबर 2027 मार्गशीर्ष पौर्णिमा
27 डिसेंबर 2027 मार्गशीर्ष अमावस्या (सोमवती अमावस्या)
26 जानेवारी 2028 मौनी अमावस्या
27 जानेवारी 2028 माघ शुद्ध 1 ते 8 फेब्रुवारी 2028 गंगा-गोदावरी महोत्सव
1 फेब्रुवारी 2028 वसंत पंचमी
7 फेब्रुवारी 2028 माघ शुद्ध एकादशी
दि.10 फेब्रुवारी 2028 माघ शुद्ध पौर्णिमा
20 फेब्रुवारी 2028 माघ कृष्ण एकादशी
21 फेब्रुवारी 2028 माघ कृष्ण भागवत एकादशी
25 फेब्रुवारी 2028 माघ वद्य अमावस्या
27 फेब्रुवारी 2008 माघ कृष्ण त्रयोदशी, महाशिवरात्री
7 मार्च 2028 फाल्गुन शुद्ध एकादशी
21 मार्च 2028 फाल्गुन वद्य एकादशी
5 एप्रिल 2028 चैत्र शुद्ध एकादशी
9 मार्च 2028 चैत्र शुद्ध 15
24 मार्च 2028 चैत्र वद्य 30
5 मे 2028 वैशाख शुद्ध एकादशी
8 मे 2028 वैशाख शुद्ध पौर्णिमा
20 मे 2028 वैशाख वद्य एकादशी
24 मे 2028 वैशाख वद्य अमावस्या
25 मे 2028 ते 2 जून 2028
3 जुन 2028 ज्येष्ठ शुद्ध एकादशी
7 जुन 2028 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा
18 जुन 2028 ज्येष्ठ वद्य एकादशी
22 जुन 2028 ज्येष्ठ वद्य अमावस्या
2 जुलै 2028 आषाढ शुद्ध एकादशी
6. जुलै 2028 आषाढ शुद्ध पौर्णिमा
18 जुलै 2028 आषाढ कृष्ण एकादशी
24 जुलै 2028 आषाढ कृष्ण तृतीया
सिंहस्थ समाप्ती दुपारी 3-36 वाजेपर्यंत.
प्रथम अमृतस्नान - सोमवारी 2 ऑगस्ट 2027
द्वितीय अमृतस्नान - मंगळवारी 31 ऑगस्ट 2027
तृतीय अमृतस्नान - रविवारी 12 सप्टेंबर 2027
3 जुलै 2027, दर्श अमावस्या
4 जुलै 2027, अमावस्या
14 जुलै 2027, देवशयनी एकादशी, चातुर्मास्यारंभ
18 जुलै 2027, व्यासपूजन, गुरुपौर्णिमा
31 जुलै 2027, शनिप्रदोष
6 ऑगस्ट 2027, नागपंचमी
दि. 12 ऑगस्ट 2027, पुत्रदा एकादशी
17 ऑगस्ट 2027, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
24 ऑगस्ट 2027, कृष्णजन्माष्टमी
28 ऑगस्ट 2027, अजा एकादशी
5 सप्टेंबर 2027, ऋषिपंचमी
15 सप्टेंबर 2027, पौर्णिमा
27 सप्टेंबर 2027, सोमप्रदोष
29 सप्टेंबर 2027, सर्वपित्री, दर्श अमावस्या
14 ऑक्टोबर 2027, कौजागरी, अश्विन पौर्णिमा
26 ऑक्टोबर 2027, गुरुद्वादशी
10 नोव्हेंबर 2027, प्रबोधिनी एकादशी
13 नोव्हेंबर 2027, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा
21 मार्च 2028, पापमोचनी एकादशी
27 मार्च 2028, गुढीपाडवा, संवत्सरारंभ
3 एप्रिल 2028, श्रीरामनवमी
27 एप्रिल 2028, अक्षय्यतृतीया
29 एप्रिल 2028 श्री शंकराचार्य जयंती
1 मे 2028, गंगा जन्मोत्सव
2 जुलै 2028, देवशयनी एकादशी, चातुर्मास्यारंभ
6 जुलै 2028, व्यासपूजन, गुरुपौर्णिमा, चंद्रग्रहण
21 जुलै 2028 दर्श अमावस्या, दीपपूजन
24 जुलै 2028 ध्वजावतरण, सिंहस्थ समारोप.