Nashik Film City Dadasaheb Phalke Memorial | नाशिकच्या मातीत फुलणार दादासाहेब फाळके चित्रनगरी

Nashik Film City Dadasaheb Phalke Memorial | चित्रीकरणासाठी निसर्गरम्य लोकेशनमुळे निर्माते आणि दिग्दर्शकांना पर्याय उपलब्ध
Nashik Film City Dadasaheb Phalke Memorial
Nashik Film City Dadasaheb Phalke Memorial
Published on
Updated on

नाशिक : अंजली राऊत

दादासाहेब फाळके स्मारकाची आणि चित्रनगरीची अवस्था गेल्या काही वर्षांत दुर्लक्षित राहिली होती. मात्र, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर नाशिकमधील चित्रनगरीचे रूपडे पूर्णपणे पालटणार आहे. केवळ कागदावर राहिलेले 'नाशिक फिल्मसिटी'चे स्वप्न आता लवकरच वास्तवात येणार आहे.

Nashik Film City Dadasaheb Phalke Memorial
Yashwantrao Chavan Kala Jeevan Gaurav award: यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्काराने महेश कोठारेंचा सन्मान

चित्रपटसृष्टीच्या विकासाला येथे नवी गती मिळणार आहे. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी नाशिकच्या मातीत भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्र्यंबकेश्वर ही त्यांची जन्मभूमी असूनही भारतातील पहिला चित्रपट बनवणाऱ्या या व्यक्तीच्या गावात ११५ वर्षानंतर अजूनही थिएटर नाही.

त्यांच्या नावाचा गाजावाजा गोरेगाव फिल्मसिटीमुळे झाला. परंतु, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आणि कलाकारांच्या सन्मानासाठी नाट्य परिषदेच्या पुढाकाराने दादासाहेब फाळके चित्रनगरी साकार होत आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीनंतर नाशिकमधील चित्रपट चळवळीला मोठी संजीवनी मिळण्याची चिन्हे आहेत. नवनिर्वाचित संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांनी नाशिकमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा कायापालटचा संकल्प केला आहे.

Nashik Film City Dadasaheb Phalke Memorial
Girish Kulkarni: आज लोकांकडे माहितीचा डोंगर आहे, पण अनुभवाचं शहाणपण शून्य- गिरीश कुलकर्णी

नाशिकमध्ये चित्रीकरणासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा आणि निसर्गरम्य लोकेशनमुळे मुंबई-पुण्यातील निर्मात आणि दिग्दर्शकांना नाशिकच्या रूपाने उत्तम आणि परवडणारा पर्याय आहे. स्थानिक कलाकारांना आणि तंत्रज्ञांनामुळे रोजगार मिळेल, असा विश्वास महामंडळाकडून व्यक्त केला जात आहे. महामंडळाचे नवे पाऊल चित्रपटसृष्टीच्या नकाशावर नाशिकला मानाचे स्थान मिळवून देणारे ठरेल.

मविप्रमध्ये भरलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात दादासाहेब फाळके चित्रनगरीचे दालन हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

ऐतिहासिक कॅमेरा नाशिकमध्येच

दादासाहेब फाळके यांनी मूकपट आणि पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. त्या काळातील दुर्मीळ आणि ऐतिहासिक कॅमेरा नाशिकमध्ये सुरक्षित आहे. परंतु, बहुतांश नाशिककरांना या ऐतिहासिक ठेव्याची माहिती नाही. नव्या चित्रनगरीच्या प्रकल्पांतर्गत या कॅमेऱ्याचे जतन करून तो सर्वसामान्यांसाठी प्रदर्शित केला जावा, असे कलारसिकांचे म्हणणे आहे.

नाशिककरांसाठी अभिमानाचा टप्पा

जागतिक पातळीवर मराठी संस्कृतीचे नावलौकिक करणाऱ्या विश्व मराठी संमेलनात दादासाहेब फाळके चित्रनगरी दालनाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे नाशिकच्या या स्मारकाचे आधुनिक 'चित्रनगरीत' होणारे रूपांतर हा नाशिककरांसाठी अभिमानाचा आणि पर्यटनाच्या दृष्टीने क्रांती घडवणारा टप्पा ठरणार असल्याची पोस्ट सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे.

चित्रपटसृष्टीचे जनक 66 दादासाहेब फाळके आहेत. या भूमीतूनच नवीन कलाकारांना संधी दिली आहे. त्यांचे 'नाशिक फिल्मसिटी'चे स्वप्न पूर्ण करू. चित्रपट महामंडळाचे हक्काचे अधिकृत कार्यालय लवकरच सुरू करण्यात येईल.

- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंंडळ

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक या वारसा स्थळासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून स्मारकाचे रूपडे बदलत आहे. 'वेद-टेक स्केप' कंपनीकडून 'बॉलिवूड स्ट्रीट' उभारण्यात आली आहे. दादासाहेब फाळके यांच्या जीवनपटावर ६ मिनिटांचा आधुनिक प्रोजेक्शन 'मॅपिंग शो' दाखवण्यात येणार आहे. ३०० आसनांचे मिनी थिएटर खुले करण्यात येणार आहे.

- सुनील पिळोदेकर, वेद-टेक स्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news