Shalarth ID Scam Nashik | 160 कोटींच्या शालार्थ आईडी घोटाळा; गरुड बंधूंसह शशिकांत हिंगणेकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Shalarth ID Scam Nashik | या सुनावणीकडे शैक्षणिक आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Court
CourtFile Photo
Published on: 
Updated on: 
Summary

  • अमोल कुलकर्णीच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

  • विनोद तराळ पसार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आईडी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सहसचिव दीपक गरुड आणि जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगणेकर यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. २८) सुनावणी होणार आहे.

Court
Nashik Kumbh Mela 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात 'अमृत स्नान' कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

या सुनावणीकडे शैक्षणिक आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शालार्थ आईडी घोटाळ्याच्या तपासादरम्यान नाशिक शहर गुन्हे शाखेने संजय गरुड याला २७ जुलैच्या रात्री सोलापूर जिल्ह्यातून अटक केली होती. त्यानंतर त्याचा भाऊ आणि संबंधित शिक्षण संस्थेचे सहसचिव दीपक गरुड यालाही अटक करण्यात आली.

या प्रकरणात गरुड बंधूंसह माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगणेकर यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. २७) सुनावणी होती. सरकार पक्षाचे सहायक अभियोक्ता तसेच संशयितांच्या वतीने वकील उपस्थित होते. मात्र, सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे आता ही सुनावणी बुधवारी (दि. २८) होणार आहे.

Court
Nashik | नाशिक कारागृहामधील भ्रष्टाचार अन् सुरक्षेतील त्रुटी !

दरम्यान, याच घोटाळाप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेला अमोल रमेश कुलकर्णी याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी (दि. २६) त्याला नाशिकरोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली. कुलकर्णी हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. संबंधित संस्थेचा सचिव विनोद रामदास तराळ याच्यासाठी शालार्थ आईडी मिळवून देण्याकरिता तो मध्यस्थ म्हणून काम करीत असल्याचा संशय आहे.

विनोद तराळ याचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला असून, तो सध्या पसार आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संशयितांची भूमिका आणि शालार्थ आईडी मिळविण्यासाठी झालेल्या 'कथित' गैरव्यवहारांचा तपास शहर गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news