Kumbh Mela Corruption Allegations | कुंभमेळ्यात विकासकामांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार

Kumbh Mela Corruption Allegations | प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ : उत्तर महाराष्ट्र काँग्रेस आढावा बैठक
Sinhasta Kumbh Mela
Sinhasta Kumbh Mela Pudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी महायुती सरकारने ३६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून नाशिकमध्ये विकासकामे केली जात असल्याचा सरकारचा दावा आहे. परंतु, प्रत्यक्षात या निधीतून जास्तीत जास्त मलाई खाण्याचे काम होत आहे. २२ कोटी रुपये मंडपावर खर्च केले जात आहेत.

Sinhasta Kumbh Mela
Simhastha Kumbh Mela | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ; प्रत्येकी 7 कोटी मिळणार

तीन कोटी रुपये हेलिपॅडवर खर्च केला जात आहे. ३५० कोटी रुपये सीसीटीव्हीवर खर्च करण्यात येत आहेत. विकासाकामांच्या नावाखाली पद्धतशीरपणे भ्रष्टाचार केला जात असून, तब्बल ५० टक्के मलाई खाल्ली जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
उत्तर महाराष्ट्र विभागातील लोकसभा प्रभारी, विधानसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी व जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. ५) पार पडली.

यावेळी अखिल भारतीय कांग्रेस कमिटी सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार शोभा बच्छाव, सहप्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, अभिजीत सपकाळ आदी उपस्थित होते. नाशिकमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांचे शिबिर झाले होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले होते, त्याच एजेंड्याचे पुनरावलोकन या बैठकीत करण्यात आले.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस सरकार या कुंभमेळ्याच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे विष पेरत आहेत, या विषाची फळे त्यांना चाखावी लागतील. नाशिकमध्ये कोणतेही काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

Sinhasta Kumbh Mela
Traffic Diversion | दिवाळी खरेदीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विशेष वाहतूक बदल; सात प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी

बोगस वर्क ऑर्डर काढल्या जात आहेत. फडणवीस यांनी भ्रष्टाचारासाठी एका मंत्र्याला नियुक्त केले आहे. भाजप - महायुती सरकारने भ्रष्टाचारासाठी पवित्र असा कुंभमेळाही सोडला नाही, असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत टाहकेर, रमेश कहंडोळे, शहराध्यक्ष नीलेश खैरे यांससह प्रभारी, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.