Nashik Kalaram Mandir Protest | काँग्रेसचा 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह'

Nashik Kalaram Mandir Protest | नाशिकच्या काळाराम मंदिरापासून आंदोलनाचा 'श्री गणेशा'
Nashik Kalaram Mandir
Nashik Kalaram Mandir
Published on
Updated on

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना (ठाकरे) पाठोपाठ आता काँग्रेस पक्षानेही आक्रमक पाऊल उचलले आहे. काँग्रेसकडून राज्यभरात होणाऱ्या 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' आंदोलनाची सुरुवात मंगळवारी (दि. ७) नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरापासून केली.

Nashik Kalaram Mandir
Congress Harshvardhan Sapkal | आंदोलन ढगफुटीची अफवा : सपकाळ रोखण्यासाठीच

भरपावसात झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या नावाने लूट करणाऱ्यांना सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. सपकाळ यांनी सकाळी ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या परिसरात जमलेल्या शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींचे प्रसिद्ध 'रघुपती राघव राजाराम' हे भजन सामूहिकपणे गात प्रभू श्रीरामाची आराधना केली. आणि आंदोलनाचा श्री गणेशा केला.

याप्रसंगी सपकाळ यांनी श्रीराम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर कडक शब्दांत टीका केली. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात 'रामचंद्र कह गये सिया से ऐसा कलयुग आयेगा, हंस चुनेगा दाना तिनका, कव्वा मोती खायेगा!' असे लक्षवेधी फलक होते, ज्याद्वारे केंद्र सरकार आणि मंदिर प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.

Nashik Kalaram Mandir
Congress Internal Politics : सपकाळविरोधी मोहिमेत वैदर्भीय नेत्याचा हात?

या ऐतिहासिक सत्याग्रहाप्रसंगी आंदोलनाचे मुख्य समन्वयक मोहन जोशी, खासदार डॉ. शोभा बच्छाव, अॅड. संदीप पाटील, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, शहराध्यक्ष निलेश खैरे, रमेश कहांडोळ, भारत टाकेकर यांची प्रमुख उपस्थित होती. याप्रसंगी पंचवटी ब्लॉक अध्यक्ष अभिजिन राऊत,

स्वप्निल पाटील, स्वाती जाधव, वत्सल खैरे, नाजिया अत्तार, केशव पाटील, विजन राऊत, रईस शेख, उद्धव पवार, ज्ञानेश्वर काळे शिवाजी गंभीर, लक्ष्मण जायभावे, गौरन पानगव्हाणे, रमेश जाधव, जयेश पोकळ, कुसुम चव्हाण, जाकीर अत्तार, भरत पाटील, किरप जाधव, हर्षल पवार, रामदास धांडे, अनिल थेटे गणपत चौधरी,

समिर देशमुख, के. के. गांगुळे दिनकर निकम, साहेबराव डोमसे, नाजिम शेख सोमनाथ मोहिते, विजय पाटील, सुनील आव्हाड मुश्ताक कुरेशी, भालचंद्र पाटील, बाळासाहे गामणे, संदीप वाघ, तानाजी गायधनी, दिली पाटील, मंगेश लहामगे, दत्ता सोनवणे, भीमरान जेजुरे, दिलीप शिंदे आणि संतोष कस्तु यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होत आगामी काळात हा सत्याग्रह राज्यभर तीन करण्याचा इशारा काँग्रेसने यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news