

नाशिक : कावेरी मोरे
नाशिककरांची सकाळ म्हणजे चहाचा कप आणि गप्पांचा सोबती. पण आता शहरात चहाबरोबरच कॉफीचे वेड झपाट्याने वाढत आहे. शहरात शैक्षणिक संस्थांमुळे त्यात प्रवेश करणाऱ्या लॉ ऑफ इंजिनिअरिंग आणि मेडिकलला प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. कारण की, शहरात आज आसपास १५० ते २०० पर्यंत कॅफेज ओपन आहेत. यात कॉफी प्रेमींची संख्या विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुण पिढींमध्ये अधिक बघायला मिळते.
शहरात कॉलेज, आयटी ऑफिसेस आणि स्टार्टअप वाढले आहे. तरुणांना आधुनिक लाइफस्टाइल म्हणून कॉफी आवडत आहे, कॅफे संस्कृतीचा प्रसार हेदेखील एक कारण आहे. नाशिकमध्ये स्टारबक्स, थर्ड वेव्ह, सीसीठी, ब्रेव्हबेरीज, चाय टपरी यांसारखी अनेक कॅफे उघडली आहेत. लोकांना भेटायला किंवा स्ट्रेस फ्री होण्यासाठी अशी ठिकाणे आवडतात.आधुनिक काळात इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट अशा सोशल मीडिया ॲप्लिकेशनवर कॉफीच्या वाइब लोकप्रिय आहेत. काही लोक सोशल मीडियावर फक्त पोस्ट करण्यासाठीही कॉफी मागवतात. काहींच्या मते कॉफीमध्ये चहापेक्षा साखर आणि दुधाचे प्रमाण कमी असते म्हणूनदेखील कॉफीची निवड करतात.
वर्षभरात २५ टक्के वाढ
स्थानिक कॅफे असोसिएशनच्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात कॉफी ऑर्डर करणाऱ्यांची संख्या एकूण २५ टक्क्यांनी वाढली आहे. तरुण वर्गात कॉफी कल्चर वाढल्याने हा बदल जास्त जाणवतो. गंगापूर रोड, कॉलेज रोड, पंचवटी परिसरात महिन्याला किमान तीन ते चार नवीन कॅफे सुरू होत आहेत. यावरून कॉफीप्रेम आता फक्त कॅफिनी नाही, तर तरुण पिढीत कल्चर होत चालले आहे.
चहाचे राज्य मात्र कायमच
कॉफीच्या वाढत्या लोकप्रियतेनंतर नाशिककरांचा चहा मात्र अजूनही अव्वल आहे. 'जान जाये पर चाय ना जाये' अशा प्रकारचे प्रेम अजूनही बऱ्याच लोकांमध्ये बघायला मिळते. अनेक जणांची सकाळची सुरुवात, दुपारची कामे आणि सायंकाळच्या गप्पा चहाशिवाय अपूर्णच आहेत
चहाला कोणी मात देऊ शकत नाही. पण जॉबमुळे दिवसभराचा जो स्ट्रेस आहे, त्याला कॉफी शिवाय पर्याय नाही.
गौरव देशमाने, नाशिक
जेव्हा अभ्यासाचा ताण वाढतो, तेव्हा नक्कीच चहाची आठवण येते. कॉफीपेक्षा चहामुळे रिफ्रेशमेंट जास्त वाटते.
सिद्धी वाडेकर, विद्यार्थिनी, नाशिक
जरी कॉफीची क्रेझ असली, तरी कॉफी इज लव्ह बट टी इज इमोशन्स असेच म्हणावे लागेल.
दीपक क्षिरसागर, नाशिक