Chief Minister Relief fund : राज्यभरात 40 हजारांहून अधिक रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचा हात

CM Relief Fund Medical Assistance-३३३ कोटींहून अधिक अर्थसाहाय्य; नाशिकच्या १३०० रुग्णांना दहा कोटींची मदत
Chief Minister Relief fund
Chief Minister Relief fundfile photo
Published on
Updated on

नामदेव भोर, नाशिक प्रतिनिधी

राज्यातील गरीब-गरजू रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने वैद्यकीय अर्थसाहाय्य वितरणात एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आर्थिक अडचणींमुळे महागड्या उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना थेट दिलासा देण्यासाठी १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात तब्बल ३३३ कोर्टीहून अधिक रुपयांची मदत करण्यात आली आहे. या भव्य मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील ४० हजारांहून अधिक रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी हा मोठा आधार मिळाला आहे.

राज्य शासनाने जिल्हापातळीवर केलेल्या विशेष सुधारणांमुळे सर्वच जिल्ह्यांतून निधीचे वितरण गतीने झाले. यात पुणे जिल्हा आघाडीवर असून, वैद्यकीय सुविधांचे मोठे जाळे आणि जागृतीमुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून, पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून सुमारे ३८६१ हुन अधिक गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने ३४ कोटी ५३ लाख रुपये मदत उपलब्ध करून दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ठाणे जिल्ह्यात २५१४ रुग्णांना एकूण २१ कोटी ७४ लाख कोटी रुपयांची भरीव मदत करण्यात आली.

उत्तर महाराष्ट्राचे केंद्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात सुमारे तेराशे गरजू रुग्णांना नऊ कोटी ८१ लाख रुपयांची मदत करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांनाही मोठ्या प्रमाणात फायदा झाला. मुंबई उपनगरात ८६९ रुग्णांना ८ कोटी १० लाख ४४ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य थेट वितरित करण्यात आले. राज्यातील गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि वाशिम यांसारख्या दुर्गम व कमी लोकसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक पातळीवरील माहितीच्या अभावामुळे तुलनेत कमी मदत वितरित झाली आहे. मात्र, आता डिजिटल प्रणालीमुळे तेथेही अर्ज मंजुरीचे प्रमाण वाढत असल्याची माहिती मुख्यमंत्री अर्थसाहाय्य कक्षाकडून देण्यात आली आहे.

गंभीर आजारांवर दर्जेदार रुग्णसेवा

शासकीय आणि इतर आरोग्य योजनांच्या मर्यादत न बसणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुख्य आधार बनला आहे. या कक्षाच्या माध्यमातून जवळपास २० प्रकारच्या गंभीर व खर्चिक आजारांवर उपचारांसाठी थेट आर्थिक मदत ५ लाख रुपयांपर्यंत दिली जाते. हृदय, यकृत (लिव्हर), किडनी आणि फुफ्फुस रोपण, कर्करोगावरील जटिल शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी यासाठी टाटा मेमोरियल सेंटरसोबत बाल कर्करोग उपचारांसाठी त्रिपक्षीय करारही करण्यात आला आहे. लहान मुलांचे कॉक्लियर इम्प्लांट, बोनमॅरो ट्रान्स्प्लांट, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग रुग्णसेवा, अपघात उपचारासाठीही मदत उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत आहे. या योजनेचे लोकचळवळीत रूपांतर केले जात आहे. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही ऑनलाइन प्रणाली आणि डिजिटल पोर्टल्सचा वापर करत आहोत-तसेच नागरिकांच्या सोयीसाठी राज्यभरात कम्युनिटी हेल्थ कॅम्प, आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष लोकसहभाग अशा विविध आयामांच्या माध्यमातून ही संकल्पना राज्याच्या कानाकोपऱ्यांत पोहोचत आहे.

- रामेश्वर नाईक, प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष.

कागदपत्रविरहित, डिजिटल प्रक्रिया

पूर्वी रुग्णांच्या नातेवाइकांना अर्जासाठी मुंबईवारी करावी लागत असे. आता मात्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाने संपूर्ण प्रक्रिया कागदपत्रविरहित आणि डिजिटल केली असून, जिल्हास्तरावर सहायता कक्ष निर्माण केला आहे. नाशिक जिल्ह्यात या कक्षाच्या माध्यमातून गत आर्थिक वर्षात सुमारे तेराशे गरजू रुग्णांना नऊ कोटी ८१ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

गंभीर आजारांवर दर्जेदार रुग्णसेवा

शासकीय आणि इतर आरोग्य योजनांच्या मर्यादत न बसणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुख्य आधार बनला आहे. या कक्षाच्या माध्यमातून जवळपास २० प्रकारच्या गंभीर व खर्चिक आजारांवर उपचारांसाठी थेट आर्थिक मदत ५ लाख रुपयांपर्यंत दिली जाते. हृदय, यकृत (लिव्हर), किडनी आणि फुफ्फुस रोपण, कर्करोगावरील जटिल शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी यासाठी टाटा मेमोरियल सेंटरसोबत बाल कर्करोग उपचारांसाठी त्रिपक्षीय करारही करण्यात आला आहे. लहान मुलांचे कॉक्लियर इम्प्लांट, बोनमॅरो ट्रान्स्प्लांट, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग रुग्णसेवा, अपघात उपचारासाठीही मदत उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news