

नाशिक : सिंहस्थ कुंभच्या तारखा जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री नाशिकमध्ये येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दुपारी 12 ते 2 दरम्यान साधुमहंतांसोबत त्यांची बैठक होणार आहे.
साधुमहंतांसोबत मुख्यमंत्री यांची बैठक होणार असून 3 वाजता जिल्हा बँकेसमोरील परशुराम भवन उद्घाटन व गुरुदक्षिणा हॉलमध्ये होणार्या उद्घाटनपर समारंभास ते हजर राहणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील चक्र या प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी गोवर्धन येथील लग्नसमारंभ सोहळ्यास उपस्थित राहणार असून त्यानंतर ते मुंबईकडे प्रस्थान करतील. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थिती असणार आहे.