

नाशिक : बस प्रवासासाठी ऑफलाइन पध्दतीने पास काढण्याकरीता सिटीलिंकतर्फे नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सिटीलिंकच्या ॲपमध्ये ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच प्रवाशांना ऑफलाइन पास काढता येणार आहे. यामुळे प्रवाशांकडून जमा होणाऱ्या खासगी कागदपत्रांचा गैरवापर टळणार असल्याचा दावा सिटीलिंकतर्फे करण्यात आला आहे.
प्रवाशांना आता "नाशिक सिटी बस" या सिटीलिंक ॲप्लिकेशनमध्ये 'अप्लाय ऑफलाईन पास' हा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला गेला. नाशिक सिटी बस ॲप अद्ययावत केल्यास ॲपच्या पडद्यावर हा पर्याय दिसेल. त्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपणास साकेतांक क्रमांक प्राप्त होईल. हा सांकेतांक आणि जोडलेल्या कागदपत्रांची मूळ प्रत सिटीलिंकच्या कोणत्याही अधिकृत पास केंद्रावर दाखवून पासची रक्कम जमा केल्यास प्रवाशांना तत्काळ पास उपलब्ध करण्यात येणार आहे.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थातच सिटीलिंकच्या वतीने नाशिक शहर व महापालिका हद्दीपासून २० किमी पर्यंत बससेवा पुरविण्यात येते. दररोज हजारो नाशिककर या बससेवेचा लाभ घेतात. नियमित बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा याकरिता सिटीलिंकच्या वतीने विविध प्रकारचे पास उपलब्ध करून देण्यात येतात. प्रवाशांना हे पास ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने काढता येतात. मात्र आता ऑफलाइन पद्धतीने पास काढण्याकरिता सिटीलिंकच्या वतीने नवीन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांनी कार्यालयात जमा केलेल्या खासगी कागदपत्रांचा कोणताही गैरवापर होऊ नये. यासाठी प्रवाशांच्या खासगी कागदपत्रांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सिटीलिंकच्या वतीने ऑफलाइन पद्धतीने पास काढण्याकरीता ही नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रवाश्यांना ऑफलाइन बस पास काढण्यासाठी 'नाशिक सिटी बस' या सिटीलिंक ॲप्लिकेशनमध्ये 'अप्लाय प्रवाशांना ऑनलाइन पास' हा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाशिक सिटी बस ॲप अपडेट केल्यास आपणास ॲप्लिकेशनच्या स्क्रीन वर 'अप्लाय प्रवाशांना ऑनलाइन पास' हा पर्याय दिसू शकेल. या पर्यायाच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपणास युनिक आय डी नंबर प्राप्त होईल. सदर युनिक आय डी नंबर व अपलोड केलेली केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रत सिटीलिंकच्या कोणत्याही अधिकृत पासकेंद्रावर दाखविल्यास पास ची रक्कम जमा केल्यास प्रवाश्यांना तात्काळ पास उपलब्ध करून देण्यात येईल. मुख्य म्हणजे ही प्रक्रिया एकदाच म्हणजे नवीन पास काढण्याकरीताच करावी लागणार आहे. पास नुतनीकरणावेळी पासधारक थेट पास केंद्रावर जाऊन पासचे नुतनीकरण करू शकतात.
नाशिक सिटी बस या ॲपपमध्ये जाऊन 'अप्लाय ऑफलाईन पास' या पर्यायावर क्लिक करावे. नंतर पासधारकाचे पूर्ण नाव, संपर्क क्रमांक, ई मेल, आधार क्रमांक अशी आवश्यक माहिती भरावी.
पासचा प्रकार निवडून आवश्यक दस्तावेज अपलोड करावेत. यात विद्यार्थी पाससाठी छायाचित्र, सत्य प्रमाणपत्र (बोनाफाईड) / सिटीलिंक अर्ज, आधारकार्ड. तर लहान मुलांच्या पाससाठी छायाचित्र, बोनाफाईड / सिटीलिंक अर्ज, आधारकार्ड. खुल्या गटातील आणि निश्चित मार्ग पाससाठी छायाचित्र व आधारकार्ड अपलोड करावे लागेल.
ही प्रक्रिया केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर कार्यालयाकडून वापरकर्त्याच्या भ्रमणध्वनीवर साकेतांक संदेशासह पाठविला जाईल.
हा क्रमांक व अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रत सिटीलिंकच्या कोणत्याही अधिकृत केंद्रावर दाखवून व पासची रक्कम जमा करून तत्काळ पास उपलब्ध करून दिला जाईल.