Nashik | डीपीतील वीजतारांचा धक्का लागून चिमुकला ठार

नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

Child dies due to electric shock
डीपीतील वीजतारांचा धक्का लागून अफान नईम खान या बालकाचा मृत्यू झाला. Pudhari
Published on
Updated on

नाशिक : उघड्या डीपीतील (मिनी पिलर) वीज प्रवाह सुरू असलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने साडे तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना जियाउद्दीन डेपो परिसरात घडली. या घटनेत अफान नईम खान (रा. पवार वाडी, सुभाष रोड) या बालकाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.

मालधक्का रोडवरील जियाउद्दिन डेपो भागातील वजन काट्याजवळ रस्त्याच्या कडेला महावितरणची वीज डीपी आहे. या डीपीचे झाकण चोरीस गेल्याने ती उघडी होती. सोमवारी दुपारी अफन खान हा त्याच्या आईसोबत गेला होता. दुपारी लहान मुलीसोबत खेळताना अफान उघड्या डीपीजवळ गेला. डीपीतील उघड्या तारांना स्पर्श केल्याने अफानला विजेचा झटका लागला. तर त्याच्यासोबत खेळणाऱ्या लहान मुलीला सुदैवाने कोणताही धक्का लागला नाही. मात्र या घटनेमुळे ती मोठ्याने रडू लागल्याने दुकानदारांचे लक्ष गेले. तोपर्यंत लहानगा अफान जोरात खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा देखील झाली. नागरिकांनी अफान यास तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र अफानचा मृत्यू झाला होता. काही महिन्यांपूर्वीही याच डीपीतील तारांना तीन वर्षीय मुलाचा धक्का लागल्याने शॉक लागून त्याचे दोन्ही हात जळाल्याची घटना घडल्याची चर्चा परिसरात होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डीपीच्या झाकणांची चोरी

सुरक्षीततेच्या कारणातून महावितरणकडून डीपीला झाकण लावले जाते. मात्र भुरट्या चोरांकडून हे झाकणे चोरली जातात. त्यामुळे डीपीतील तारांचा प्रश्न गंभीर होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news