छत्रपती शिवराय आमच्यासाठी अस्मितेचा विषय : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नांदगाव येथे शिवसृष्टीचे लोकार्पण

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नांदगाव येथे शिवसृष्टीचे लोकार्पणPudhari News Network
Published on
Updated on

नांदगाव : मालवणमधील घटना क्लेशदायक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्यासाठी राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. हा आमच्यासाठी श्रद्धा, अस्मिता आणि भक्तीचा विषय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नांदगाव येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 30) मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, मालवणमधील पुतळ्याची दुर्घटना वेदना देणारी आणि मनाला चटका लावणारी असल्याचे सांगितले. या घटनेचे राजकारण करणे, त्यापेक्षा अधिक दुर्दैवी आहे. उपरोक्त घटनेत जे दोषी असतील, त्यांना सोडले जाणार नाही. चौकशीसाठी शासनाने समित्या स्थापन केल्या आहेत. दोषींना शिक्षा केली जाईल. मालवण येथे लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नौदल व राज्य सरकार उभारणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांचा 71 फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. राज्यात इतक्या उंचीचा पुतळा नसल्याचा दावा नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केला. सर्व नियमांचे पालन करून, अत्यंत काळजीपूर्वक हा पुतळा उभारण्यात आल्याचेही मालवणच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नमूद केले. पालकमंत्री दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे, आ. सुहास कांदे, किशोर दराडे, बापुसाहेब कवडे भाऊसाहेब चौधरी, राजेश कवडे अंजुम कांदे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news