

येवला (नाशिक): तालुक्यातील 36 गावात मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याने जनजीवन योजनेच्या अंतर्गत पाणी योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. पैकी 25 गावांना नियमित पाणीपुरवठा सुरू असून 11 गावांना अद्याप पाणीपुरवठा सुरू नसल्याने मंत्री भुजबळ यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत तत्काळ योजना पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. जलजीवन योजना कामाचा आढावा बैठक मंत्री भुजबळ यांनी घेतली.
बैठकीत येवला- निफाड तालुक्यातील 26 गावात जलजीवन योजना अंतर्गत काम मंजूर करण्यात आले होते. कानलद येथील अपवाद वगळता 25 गावांच्या योजना पूर्ण झाल्या असून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. कामे अपूर्ण असलेल्या गावापैकी पाटोदा, ठाणगाव आणि कानडी या ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य असताना देखील विहिरीचे पाणीपुरवठा केला जात आहे.
‘पाटोदा येथे 12 हजार लोकसंख्या आहे. गावात बाजारपेठ, शाळा, कॉलेज आहे. गावालाविहिरीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. येवला 38 गाव, राजापूर 46 गाव, धुळगाव 16 गाव या पाणी योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात शुद्ध पाणी पोहचावे. पाटोदा गावाला लवकरच 38 गाव पाणी पुरवठा योजनेतून शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल.
डॉ. मोहन शेलार, उपाध्यक्ष 38 गाव पाणी पुरवठा योजना
या योजनेसाठी विहिरीचा पाणीपुरवठा केला जाईल अशा स्वरूपाची मंजूर करण्यात आल्याचे डॉ मोहन शेलार यांनी मंत्री भुजबळ यांचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पाटोदा या गावाला 38 गाव योजनेचे पाणी कोणत्या ठिकाणाहून सोडणे सोयीस्कर होईल याबाबत सर्व्हे करून तत्काळ 38 गाव योजनेचे पाणी जोडण्यात संदर्भात सूचना भुजबळ यांनी केल्या. सोबतच ठाणगाव कानडी या गावांना धूळगाव 16 गाव पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केली. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, 38 गाव पाणी योजना उपाध्यक्ष मोहन शेलार, कार्यकारी अभियंता जी. पी. निवडूंगे, उपअभियंता संदीप शिंदे, उपअभियंता अनिल गर्जे आदी उपस्थित होते.