चंपाषष्ठी | यळकोट यळकोट जय मल्हार ! आज घरोघरी मल्हारी मार्तंडाचे पूजन

Champa Shashti 2024 | तळी भरून भंडारा उधळत होणार मार्तंडभैरवाचा 'यळकोट'
Champa Shashti 2024
चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभfile
Published on
Updated on

नाशिक : मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्ठीपर्यंत सहा दिवसांच्या उत्सवाची सांगता चंपाषष्ठीने शनिवारी (दि. ७) होणार आहे. या निमित्ताने शहर व परिरसरात सर्वत्र खंडोबाचे पूजन भंडारा उधळत तळी भरून सण साजरा होत आहे.

मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी ही चंपाषष्ठी अथवा मार्तंडभैरव षष्ठी म्हणून सर्वत्र साजरी होते. मार्गशीर्ष महिन्याला सोमवार (दि. २)पासून प्रारंभ झाला. याच दिवसापासून मार्तंडभैरव षड‌्यात्रोत्सवासही प्रारंभ झाला. या मासाचा पहिला दिवस 'खंडोबाची नवरात्री' आणि 'देवदिवाळी' म्हणून साजरा झाल्यानंतर सहा दिवसांच्या षड‌्रात्री उत्सवाचा समारोप शनिवारी (दि. ७) चंपाषष्ठीला खंडोबा पूजनाने होणार आहे. ज्या परिवारांमध्ये खंडोबा कुलदैवत आहे तिथे चंपाषष्ठीनिमित्त कुलाचार-कुलधर्म करण्याची परंपरा असते. तत्पूर्वी पाच दिवस अनेक घरांमधील सदस्य उपवास करतात. सहाव्या दिवशी खंडोबाची षोडशोपचार पूजा करून महानैवेद्य दाखवला जातो. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप लावला जातो.

देवळाली येथील खंडोबा मंदिरात तसेच शहर व परिसरातील खंडोबा मंदिरांत उत्सव साजरा होतो. चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. मल्हारी मार्तंड हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो. घरोघरी मार्तंड भैरवाची म्हणजे मल्हारी मार्तंड देवतेची विधिवत पूजा करून भंडारा उधळत तळी उचलण्याचा विधी केला जातो.

चंपाषष्ठीचे महत्त्व

भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणि या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात. या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतल्याचे पुराणात सांगितले जाते. हे युद्ध अवघ्या सहा दिवसांतच संपले. याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती. हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो.

चंपाषष्ठी पूजा विधी

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो. या सहा दिवसांत मार्तंडदेवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात. तसेच विधिवत खंडोबाची पूजा करून आरती म्हटली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी धान्यांचे पीठ (ठोंबारा) गव्हाचा रोडगा आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. काही परिवारात प्रथेनुसार पुरणपोळी किंवा श्रीखंडाचाही नैवद्य दाखवला जातो. तसेच दिवे ओवाळणीची देखील पद्धत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news