Central Railway News | दिवाळीसाठी ५७० विशेष रेल्वे गाड्या

महाराष्ट्रातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड साठी १०८ गाड्या
Central Railway News |
दिवाळी आणि छट पूजा सणांच्या निमित्ताने मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एकूण ५७० विशेष ट्रेन सेवांची घोषणा केली.File Photo
Published on
Updated on

देवळाली कॅम्प : दिवाळी आणि छटपूजा सणांच्या निमित्ताने रेल्वे गाड्यांना गर्दी होत आहे. आरामदायी प्रवास साध्य करण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एकूण ५७० विशेष ट्रेन सेवांची घोषणा केली आहे. त्यापैकी ४२ सेवा आधीच सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि जनरल डब्यांच्या मिश्र गाड्या आणि अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. दिवाळी, छटपूजा विशेष गाड्या मुंबई, पुणे, नागपूर येथून देशभरातील विविध ठिकाणी चालवल्या जात आहेत. ५७० दिवाळी स्पेशलपैकी १०८ सेवा महाराष्ट्रातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्यांसाठी आहेत.

उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी आणि इतर ठिकाणी ३७८ सेवा चालवत आहे. ३७८ सेवांपैकी १३२ सेवा मुंबईतून, १४६ सेवा पुण्यातून आणि उर्वरित इतर ठिकाणांहून मध्य रेल्वेवर चालवल्या जात आहेत. दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बंगळुरू आणि इतर ठिकाणी ८४ सेवा चालवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news