Nashik News : वृक्षतोड रोखण्यासाठी सेलिब्रेटिज मैदानात

सयाजी शिंदे, वरुण सुखराज येणार; जनहित याचिकाही दाखल होणार
Nashik News
Nashik News : वृक्षतोड रोखण्यासाठी सेलिब्रेटिज मैदानातFile Photo
Published on
Updated on

Celebrities take to the field to stop tree felling

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीच्या नावाखाली तपोवनातील १८२५ वृक्षांची कत्तल करण्यास सरसावलेल्या महापालिका प्रशासनाविरोधातील नाशिककरांचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी आता सेलिब्रेटीदेखील मैदानात उतरले आहेत. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह दिग्दर्शक वरुण सुखराज व मुंबईतील पर्यावरणवादी संघटना नाशिक मध्ये येत्या दोन दिवसांत दाखल होत आहेत. इतकेच नव्हे तर, नाशिकमधील पर्यावरणप्रेमींकडूनही महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

Nashik News
MSRTC Service : 12 तासांचे कर्तव्य; ओव्हर टाईम मात्र पावणेदोन तास

साधुग्राम उभारणीत अडथळा ठरत असलेली तपोवनातील १८२५ झाडे तोडण्यासाठी हरकत व सूचना मागवून त्यावर सुनावणीची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने पूर्ण केली आहे. तोडण्यात येणाऱ्या झाडांवर पिवळ्या रंगांच्या फुल्या मारून रेखांकन करण्यात आले आहे. यावरून पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त करताना महापालिकेविरोधात रणशिंग फुंकले आहे.

हरकतींवरील सुनावणीच्या वेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. त्यानंतर महापालिकेने सरसकट सर्वच झाडे तोडली जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी आता कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड होऊच नये, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. त्या विरोधात लोकजागरण चळवळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik News
Rape Case | मालेगाव पुन्हा हादरले... 13 वर्षीय बालिकेवर 55 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार...

त्याचाच एक भाग म्हणून एकीकडे जनहित याचिका दाखल करताना दुसरीकडे सोशल मीडिया व सेलिब्रिटींच्या माध्यमातून आंदोलन उभारले जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांत अभिनेते सयाजी शिंदे, दिग्दर्शक वरुण सुखराज यांच्यासह सेलिब्रिटिज नाशिकमध्ये येऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करणार असल्याची माहिती राजू देसले यांनी दिली.

नाशिकची वनराई धोक्यात

नाशिकची ओळख गर्द झाडी आणि थंड तापमानामुळे झालेली आहे. नाशिकच्या चहूबाजूने द्राक्षांचे फुललेले मळे, वर्षभर केली जाणारी शेती आणि धरणांचे जाळे यामुळे नाशिकचे हवामान बाराही महिने थंडगार राहते. मुंबईचे नागरिक उन्हाळ्यात सुट्टीसाठी नाशिकला आवर्जून येतात. परंतु सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे नाशिकची हिरवीगार ओळख धोक्यात आली आहे.

सोशल मीडियावर लढा तीव्र

साधुग्रामसाठी हजारो झाडांची कत्तल करणे गंभीर आहे. याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 4 तल्हा शेख यांनी सोशल मीडियावर आवाज उठविल्यानंतर तिखट प्रतिक्रिया उमटल्या. दोन कोटींहून अधिक नागरिकांनी त्या रील्स बघितल्या. त्यामुळे वृक्षप्रेमींच्या वृक्षतोडीविरोधातील चळवळीला सोशल मीडियावरून बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news