नाशिकसह ३३ ठिकाणी सीबीआयची छापेमारी

पासपोर्ट भ्रष्टाचार : अधिकारी, दलालांवर १२ गुन्हे दाखल
संत विजयदास
संत विजयदास

नाशिक : पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयाने शनिवारी (दि. २९) मुंबई आणि नाशिक परिसरात एकूण ३३ ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये सीबीआयने पासपोर्ट अधिकारी व दलालांवर एकूण १२ गुन्हे दाखल केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

सीबीआयने पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट वितरित करण्यात आले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट वितरण करून त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचा दावा सीबीआयने केला आहे. त्या अनुषंगाने मुंबईमधील परेल व मालाड परिसरासह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.

सीबीआयने केलेल्या कारवाईत मुंबईमधील दोन पासपोर्ट सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने पासपोर्ट सेवा केंद्रांवर संयुक्तपणे छापेमारी केली. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड झाला आहे. सीबीआयने आता या प्रकरणासंदर्भात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयच्या या कारवाईमुळे राज्यातील अन्य भागातील पासपोर्ट कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news