

ठळक मुद्दे
संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजना मानधनात एक हजारने वाढ
दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक मानधनात तब्बल एक हजार रुपयांची वाढ
नाशिक जिल्ह्यातील दहा हजारहून अधिक दिव्यांगांना दरमहा २,५०० रुपये मानधन
Monthly honorarium of disabled beneficiaries increased by a whopping Rs. 1,000
नाशिक : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक मानधनात तब्बल एक हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील दहा हजारहून अधिक दिव्यांगांना आता दरमहा १,५०० रुपयांऐवजी थेट २,५०० रुपये मानधन मिळणार आहे. या निर्णयामुळे दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाचा मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील 10 हजारांहून अधिक दिव्यांग लाभार्थी या निर्णयामुळे लाभान्वित होणार आहेत. सामाजिक न्याय विभागाने वाढीव मानधन तात्काळ लागू करण्याचे आदेश दिले असून, पहिला वाढीव हप्ता या महिन्यातच थेट बँक खात्यावर जमा होणार आहे. निर्णयामुळे लाभार्थ्यांना उपचार, औषधे आणि दैनंदिन गरजांसाठी आर्थिक आधार मिळणार आहे. सामाजिक न्याय अधिकारी कार्यालयाने सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवण्याचे आणि प्रलंबित अर्ज त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे 50 हजार 748 लाभार्थी असून यातील 97 टक्के लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. केवळ 3 टक्के म्हणजे 2 हजार लाभार्थ्यांचे ई-केवायसी शिल्लक आहे. श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेच्या 71 हजार लाभार्थ्यांपैकी 95 टक्के लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून साडेतीन हजार (5 टक्के) लाभार्थ्यांचे ई-केवायसी शिल्लक आहे. या लाभार्थ्यांनी त्वरित ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावे
माधुरी आंधळे, तहसिलदार, संजय गांधी निराधार योजना.