Buy Vehicle | राज्यात वाहन खरेदीत सहा वर्षांनी 'टॉप गिअर'

2018 च्या तुलनेत 2024 मध्ये सहा टक्के वाढ; दुचाकींना सर्वाधिक पसंती
Buy Vehicle | 'Top gear' in vehicle purchase in the state after six years
राज्यात वाहन खरेदीत सहा वर्षांनी 'टॉप गिअर'Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : गौरव अहिरे

राज्यात मागील वर्षी सर्वाधिक वाहन खरेदी झाली आहे, तर 2018 सालच्या तुलनेने 2024 मध्ये सुमारे सहा टक्के जादा वाहन खरेदी झाल्याने नवीन वाहन खरेदीचा 'टॉप गिअर' पडला आहे. 2024 मध्ये राज्यात 28 लाख 87 हजार 898 वाहने खरेदी झाली आहेत. त्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

Summary

वाहननिहाय खरेदी

  • दुचाकी - 20,50,513

  • तीनचाकी - 80,898

  • कार - 4,49,235

  • अवजड वाहने - 2,25,769

  • कॅब - 51,546

वाढते शहरीकरण, लोकसंख्या, रस्ते यामुळे नागरिकांकडून वाहनांचा वापर वाढला आहे. त्यातही खासगी वाहनांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. वाहनांमुळे कामे जलद होत असल्याने अनेकांनी दुचाकी वाहन खरेदीस प्राधान्य दिले आहे. वाहनांसाठी कर्ज उपलब्धता सहज असल्याने नागरिक वाहन खरेदीसाठी उत्सुक असतात. त्यामुळे दरवर्षी वाहन खरेदीचा आलेख चढता आहे.

2009 ते 2024 या 15 वर्षांच्या कालावधीत राज्यात 3 कोटी 47 लाख 83 हजार 260 वाहनांची खरेदी झाली आहे. त्यात 2018 ला 27 लाख 10 हजार 716 वाहनांची खरेदी झाली होती. मात्र, त्यानंतर वाहन खरेदीचा आलेख घसरला होता. 2020 मध्ये कोरोना प्रादुर्भाव असल्याने 17 लाख 75 हजार 110 वाहनांची खरेदी झाली. त्यानंतर पुन्हा वाहन खरेदीचा आलेख चढता राहिला असून, राज्यात 2024 सर्वाधिक 28 लाख 87 हजार 898 वाहनांची खरेदी करण्यात आली.

Buy Vehicle | 'Top gear' in vehicle purchase in the state after six years
Nashik News | राज्याच्या तिजोरीत नाशिक ‘आरटीओ’चा 440 कोटी महसूल

वाहनांचे इंजीन प्रकार

  • भारत स्टेज सहा - 25,33,804

  • भारत टर्म स्टेज तीन ए - 83,078

  • सीईव्ही स्टेज चार - 7,397

  • भारत स्टेज तीन सीईव्ही - 5,048

  • टर्म स्टेज पाच - 1,932

  • युरो 6 - 309

  • टर्म स्टेज पाच - 284

  • सीईव्ही स्टेज पाच - 228

  • भारत स्टेज तीन - 127

  • माहिती उपलब्ध नाही - 2,55,625

इंधन प्रकारानुसार वाहने

पेट्रोल - 19,66,030

पेट्रोल-सीएनजी - 1,67,596

ईव्ही - 86,848

पेट्रोल-इथेनॉल - 59,081

पेट्रोल-हायब्रीड - 28,068

स्ट्राँग हायब्रीड ईव्ही - 8,936

एलपीजी - 6,965

पेट्रोल एलपीजी - 175

हायब्रीड ईव्ही - 12

इतर - 13,697

राज्यात नाशिक चौथ्या क्रमांकावर

  • राज्यात मागील वर्षभरात सर्वाधिक वाहन खरेदी झाली आहे.

  • पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 3 लाख 3 हजार 88 वाहनांची खरेदी झाली.

  • त्याखालोखाल पिंपरी चिंचवडमध्ये 1 लाख 91 हजार 991 वाहने

  • ठाणे जिल्ह्यात 1 लाख 26 हजार 967 वाहने

  • नाशिक जिल्ह्यात 1 लाख 19 हजार 838

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 99 हजार 871 वाहनांची खरेदी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news