सातपूर : नाशिक शहरात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने सातपूर विभागात डेंग्यू डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधण्याची मोहीम हाती घेत १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
मनपा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत प्रभाग क्रमांक आठमधील नवीन बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी टाक्यांमध्ये डेंग्यू अळ्या तयार होत असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी औषध फवारणी करून बांधकाम व्यावसायिकाकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी मनपा मलेरिया विभागाचे डॉ. कोशिरे, नारायण जाधव, संदीप काळे उपस्थित होते.