Blue Snarfing : आता ‘ब्लूस्नार्फिंग’चा धोका; सायबर भामट्यांची नवी शक्कल

सायबर भामट्यांची नवी शक्कल; पोलिसांकडून सावधगिरीचा इशारा
Bluetooth Threats Smart Devices
Bluetooth pudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : सायबर भामटे नागरिकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्ती शोधत असतात. ऑनलाइन पद्धतीने गंडवण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू असताना आता 'ब्लूस्नार्फिंग'ची भर पडली आहे. हे तंत्र वापरून हॅकर नागरिकांच्या मोबाइलचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा देत सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचेही आवाहन केले आहे. (Hackers are trying to take control of citizens' mobiles using bluesnarfing)

मोबाइलच्या माध्यमातून बहुतांश नागरिक ऑनलाइन आर्थिक व्यवहार करीत आहेत. तसेच बँक खाते, महत्त्वाची कागदपत्रेही मोबाइलमध्ये लिंक असतात. हा डाटा मिळविण्यासाठी भामटे मोबाइलचा ताबा घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. ऑनलाइन पद्धतीने किंवा 'एआय'चा वापर करून भामटे नागरिकांना फसवत आहेत. आता ब्लूटुथमार्फत नागरिकांचे मोबाइल हॅक करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. ब्लूस्नार्फिंगच्या माध्यमातून सायबर भामटे गंडा घालत आहेत. त्यामुळे ब्लूटुथचा वापर सावधानपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे ब्लूस्नार्फिंग

मोबाइलच्या ब्लूटुथ डिव्हाइसमधील डेटाची अनधिकृतरीत्या ब्लूस्नार्फिंगच्या माध्यमातून चोरी करण्यात येते. मोबाइलमधील संपर्क क्रमांक, संदेश आणि मल्टिमीडिया फाइल्सचा ताबा भामट्यांकडे जातो. मोबाइल वापरकर्त्यास याची भणकही नसते. या माहितीच्या आधारे भामटे नागरिकांना गंडा घालतात.

अशी घ्या काळजी

  • ब्लूटुथला कठीण पासकोड ठेवा.

  • मोबाइलचे ब्लूटुथ वापरात नसाल तेव्हा ते बंद ठेवा.

  • मोबाइलचे सॉफ्टवेअर वारंवार अद्ययावत करून घ्यावे.

  • अनोळखी व्यक्तींकडून ब्लूटुथ पेअरिंग करू नये, देऊ नये.

  • अनोळखी लिंक ओपन करू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news