Nashik News | समृद्धी विरोधात सिन्नर घोटी महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको

पांर्ढुली चौफुली येथे शेतकरी उतरले रस्तावर; समृद्धी विरोधात रास्ता रोको आंदोलन
Sinner Ghoti Highway
सिमंतीनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर घोटी महामार्गावर पांर्ढुली चौफुली येथे समृद्धी विरोधात रास्ता रोको आंदोलन करताना संतप्त शेतकरी.(छाया : विकास दळवी)

विंचुरी दळवीः सिन्नर तालुक्यातील पांर्ढुली चौफुली येथे आमदारकन्या व जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी कोकाटे आक्रमक झाल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी विरोधात पांर्ढुली रस्त्यावर शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. शेतकरी थेट रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.

शिवडा ते पांर्ढुली या रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात आमदार कन्या सिमंतीनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवडा व परीसरातील शेतकर्‍यांनी समृद्धीच्या अधीकार्‍यांविरोधात तसेच बांधकाम विभागाच्या विरोधात सिन्नर घोटी महामार्गावर पांर्ढुली चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे येथील महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. समृद्धीसाठी वापरण्यात येणार्‍या अवजड वाहनांची नेहमीच शिवडा पांर्ढुली रस्त्याने ये- जा होत असते. मात्र समृद्धी लगतच्या शिवडा पांर्ढुली रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनचालकांना विविध अडणींना सामोरे जावे लागत असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पाठीचे दुखणे सुरु झाले आहे.

Sinner Ghoti Highway
रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर लागलेल्या लांबच लांब वाहनांच्या रांगा.(छाया : विकास दळवी)

येथील रस्त्यामुळे अनेकदा अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला आहे. परीसरातील शेतकर्‍यांनी समृद्धीच्या अधीकार्‍यांना व बांधकाम विभागाला वेळोवेळी रस्ता दुरुस्त करा असे सांगुनही अधीकारी वर्ग व बांधकाम विभाग याकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष करत आहेत, असे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांचे म्हणने आहे. समृद्धीच्या अधीकार्‍यांनी लेखी आश्वासन दिले तरच रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात येईल अशी भुमीका सिमंतीनी कोकाटे यांनी घेतली आहे. जवळजवळ पाचशे ते सहाशे आंदोलनकर्ते आंदोलनस्थळी उपस्थीत झाले आहेत. यावेळी समृद्धीच्या अधीकार्‍यांना शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले, तेव्हा अधीकार्‍यांनी रस्ता तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त करुन देतो असे आश्वासन दिले असून आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या आंदोलनावर सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख व सिन्नर पोलीस स्टेशनचे कर्मचारी लक्ष ठेऊन होते. रस्ता दुरुस्त नाही केला तर परत यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news