

सिडको (नाशिक) : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पुंजाराम गामणे व माजी नगरसेविका किरण दराडे गामणे यांनी मंगळवारी (दि.17) रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथे पक्षप्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पुंजाराम गामणे व माजी नगरसेविका किरण दराडे गामणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सिडकोत शिवसेना ठाकरे गटाला मोठे भगदाड पडले आहे. या वेळी नामदार दादा भुसे, अजय बोरस्ते व महानगरप्रमुख प्रविण तिदमे उपस्थित होते. या वेळी इतर भागातील देखील शिंदे गटात प्रवेश झाले आहेत.