Bird Flu Outbreak | नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव! नाशिकच्या कुक्कुटपालकांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे दक्षतेचे आवाहन

Bird Flu Outbreak | नवापूर येथील बर्ड फ्लू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Bird Flu
Bird Flufile
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव नवापूर (जि. नंदुरबार) येथे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक व कुक्कुट व्यवसायिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Bird Flu
Nashik Investment Summit | नाशिक आता उद्योगांचे 'न्यू मॅग्नेट'! 13 हजार 190 कोटींचे करार आणि 32 हजार रोजगारांची संधी

बर्ड फ्लू हा कुक्कुट पक्ष्यांत वेगाने पसरणारा असून, त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे कुक्कुटपालन केंद्रांवर कोणतीही लक्षणे दिसल्यास ती तत्काळ गांभीयनि घेणे आवश्यक आहे. पक्ष्यांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढणे, खाद्य व पाण्याचे सेवन कमी होणे, सुस्ती किंवा अशक्तपणा, अंडी उत्पादनात अचानक घट, श्वसनास त्रास किंवा नाकातून स्त्राव येणे ही लक्षणे आढळल्यास त्वरित जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यास तसेच संबंधित पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.

माहिती प्राप्त होताच पशुसंवर्धन विभागामार्फत तज्ज्ञ पथक पाठवून नमुने संकलित करण्यात येऊन उपाययोजना राबवण्यात येतील. कोणतीही संशयास्पद घटना तत्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणावी, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. धर्माधिकारी यांनी कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news