

लासलगाव वृत्तसेवा- केंद्र शासनाने दिनांक 13 सप्टेंबर 2024 रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पुन्हा नोटिफिकेशन काढून कांद्यावरील किमान निर्यात शुल्क 20 टक्क्याने घटवले आहे. वित्त मंत्रालयाचे उपसचिव अमृता टाइट्स यांनी याबाबतचे नोटिफिकेशन काढले.
नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा बाजारात आल्याने कांद्याचे भाव पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी, निर्यातदार यांनी कांदा निर्यातीचे शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. याचे कारण म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा अतिशय कमी दरात जागतिक बाजारपेठेत विक्री होत असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली होती.
भारत सरकारने कांदा निर्यात बंदी वरील घातलेले किमान निर्यात मूल्य दराची निर्बंध उठविले यानंतरलागलीच दुसरे नोटिफिकेशन काढत कांद्यावरील निर्यात शुल्क 20 टक्क्याने घटविल्याने आता त्याचा फायदा कांदा भाव वाढण्यात मोठी मदत होणार आहे. तसेच परदेशी कांदा निर्यातीस व्यापारी वर्गास मोठा वाव मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.