Bhondu Ashok Kharat Case | भोंदू खरातसह आवारेला न्यायालयीन कोठडी

Bhondu Ashok Kharat Case | भोंदूगिरी, आर्थिक गैरव्यवहार आणि विविध गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेला भोंदू अशोक खरात व त्याचा सहकारी उद्योजक नामकर्ण आवारे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदूगिरी, आर्थिक गैरव्यवहार आणि विविध गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेला भोंदू अशोक खरात व त्याचा सहकारी उद्योजक नामकर्ण आवारे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

Ashok Kharat Case
Nashik Temperature 2026 | नाशिकचे तापमान 39.9 अंश सेल्सिअस; रस्ते निर्मनुष्य

सिन्नर येथील श्री जगदंबा पतसंस्थेमध्ये ३२ बनावट खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या प्रकरणात अशोक खरात यापूर्वी पोलिस कोठडीत होता. तपासादरम्यान उद्योजक नामकर्ण आवारे याने खरातला मदत केल्याचे व गैरव्यवहारात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने काही दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती. त्यालाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

Ashok Kharat Case
Medical Miracle | बाळाच्या पोटात अर्भक !

गुरुवारी दोघांना एकत्रित न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर सायंकाळी उशिरा दोघांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

अशोक खरातविरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकूण १८ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये महिलांच्या लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणुकीच्या गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू असून, आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे नाशिक, पुणे व शिर्डी येथे दाखल आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पोलिस यंत्रणांकडून वेळोवेळी त्याचा ताबा घेऊन चौकशी करण्यात येत आहे.

आर्थिक गैरव्यवहार आणि कथित मनी ट्रेलच्या अनुषंगाने आता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) देखील अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता व्यक्त होत असून, लवकरच या प्रकरणात ईडीकडून चौकशीला वेग येण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news