Nashik Accident News | भगूर-पांढुर्ली मार्गावर भीषण अपघात; दोन युवकांचा मृत्यू, विंचुरीदळवीत शोककळा

Nashik Accident News | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'छोटा हत्ती'ची जोरदार धडक; विंचुरीदळवी परिसरावर शोककळा
Nashik Accident News
Nashik Accident News | भगूर-पांढुर्ली मार्गावर भीषण अपघात; दोन युवकांचा मृत्यू, विंचुरीदळवीत शोककळा file photo
Published on: 
Updated on: 

विंचुरीदळवी (पुढारी वृत्तसेवा):

भगूर-पांढुर्ली मार्गावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मिठाई आणण्यासाठी गेलेल्या दोन युवकांना भरधाव मालवाहू 'छोटा हत्ती' वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अक्षय भाऊसाहेब पवार (२९) याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेला शुभम शिवराम भोईर (२९, दोघे रा. विंचुरीदळवी) याचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Nashik Accident News
Nashik and Dindori drought relief decision- नाशिक-दिंडोरी तालुक्यांची अद्यापही उपेक्षा

एकाच अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने विंचुरीदळवी परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अक्षय पवार आणि शुभम भोईर हे दोघे मिठाई आणण्यासाठी बाहेर पडले होते. दरम्यान, भगूर-पांढुर्ली मार्गावर समोरून आलेल्या भरधाव मालवाहू 'छोटा हत्ती' वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, अक्षय पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम भोईर गंभीर जखमी झाले होते. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक व वाहनचालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

Nashik Accident News
Nashik and Dindori drought relief decision- नाशिक-दिंडोरी तालुक्यांची अद्यापही उपेक्षा

जखमी शुभम याला खाजगी वाहनातून धामणगाव येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्री उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, भगूर-पांढुर्ली मार्गावर सुरू असलेली कामे, उडणारी धूळ आणि वाहनांचा वाढता वेग यामुळे अपघाताचा धोका कमालीचा वाढल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या मार्गावर संबंधित प्रशासनाने तातडीने योग्य त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.