

निफाड ( नाशिक ) : बैलपोळा सणानिमित्त निफाड तालुक्यातील शिवरे गावामध्ये डीजेच्या तालावर ग्रामपंचायत कार्यालयावर नर्तिका नाचवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
निफाड तालुक्यातील शिवरे गावात शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान बैलपोळा सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात बैलांसमोर नर्तिकांचे नाच सुरू होते. मात्र, कार्यक्रमादरम्यान काही नर्तिका थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर नृत्य करू लागल्या. ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर नाचत असतानाचा हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली असून रात्री उशिरा निफाड पोलिसांकडून आयोजक व डीजे मालकावर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.