Bachchu Kadu : शेतकरी जन संवाद मेळावा - गणेश निंबाळकरांना प्रहार संघटनेची उमेदवारी

प्रहार संघटनेची उमेदवारी जाहीर
शेतकरी जन संवाद मेळावा
देवळा / उमराणे: येथे शेतकरी जनसवांद मेळाव्यात बोलतांना आमदार बच्चू कडू समोर उपस्थित जनसमुदाय (छाया ; सोमनाथ जगताप)
Published on
Updated on

देवळा : "चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात शेती आणि मातीच्या प्रश्नांना घेऊन नेहमी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या गणेश निंबाळकर या शेतकरी पुत्राला प्रहार संघटनेची उमेदवारी देत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विजयी करून मतदानाचा आशीर्वाद द्या" अशी जाहीर घोषणा प्रहार जनशक्तीचे संस्थापक आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu (बच्चू कडू) Member of the Maharashtra Assembly) यांनी बुधवार, दि. १८ रोजी तालुक्यातील उमराणे येथे आयोजित शेतकरी जन संवाद मेळाव्यात केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब निकम तर व्यासपीठावर माजी उपसभापती धर्मा देवरे, बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, हरिसिंग ठोकेन, नंदन देवरे , बाळासाहेब देवरे, खुंडू देवरे, कैलास देवरे, अविनाश देवरे आदी उपस्थित होते.

शेतकरी जन संवाद मेळावा
नाशिक : निफाडला आज आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा

यावेळी बोलताना आमदार कडू म्हणाले की, जाती धर्माच्या नावावर होणाऱ्या निवडणूका व धनशक्तिची ताकद ही व्यवस्था आम्हाला मोडायची असून यावर प्रहार करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाची बॅट सज्ज आहे. आगामी विधानसभा निवडणुकात पक्षाची बॅट षटकार मारल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आम्ही दिलेल्या शेतकऱ्यांची जाण असलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.

चांदवड- देवळा तालुक्याचे कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्न गंभीर आहेत. अधिकारी वर्ग खाजगी कंपन्यांना पूरक भूमिका घेतात त्यांना त्याचे पैसे मिळत असतील. परंतु प्रहार अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवेल असा सज्जड दम त्यांनी पीकविमा गैर प्रकारावरून अधिकाऱ्यांना दिला.

आपली साथ हवी - गणेश निंबाळकर

याप्रसंगी प्रहार जनशक्तीच्या वतीने जाहीर करण्यात आलेले उमेदवार गणेश निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की 'देवळा तालुक्यातील चनकापूर उजव्या कालव्याद्वारें पाणी पूर्व भागातील उमराणे ते शेवटच्या झाडी पर्यंत नेऊन पूर्व भागातील शेती पाणी प्रश्न सोडविण्याचा आमचा मानस असून यासाठी मला आपली साथ हवी आहे. मी जरी चांदवडचा रहिवासी असलो तरी कुठलाही प्रांत वाद न करता मला आपण आशीर्वाद द्यावे' याबरोबर त्यांनी आपले देवळा तालुक्यातील गिरणारे हे आजोळ असल्याचे देखील जाणीव करून दिली.

यावेळी हरीभाऊ महाजन, बंटी सिंग, प्रकाश चव्हाण, राम बोरसे, भाऊसाहेब मोरे, शशिकांत पवार, राजू शिरसाठ, कुबेर जाधव, संदीप देवरे, तुषार शिरसाठ आदींसह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उमराणे येथे आमदार बच्चू कडू यांची आकर्षक सजावट केलेल्या बैलगाडीतून मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news