Auction of vehicles | मालेगावमध्ये १४ नोव्हेंबरला वाहनांचा लिलाव
नाशिक : मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या ८ वाहनांचा ई-लिलाव गुरुवारी (दि. १४) सकाळी ११ ला कार्यालयात होणार आहे.
इच्छुकांनी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. ई-लिलावात बस, ट्रक, टॅक्सी, हलकी मालवाहू वाहने व ऑटोरिक्षा या वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहनमालकांना वाहन कर व पर्यावरण कर भरण्याची संधी असणार आहे.
नोंदणी करणे आवश्यक
लिलावात सहभागी होण्यासाठी ७ ते १२ नोव्हेंबर कालावधीत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. ई-लिलावाच्या अटी-शर्ती, वाहनांचा तपशील वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

