दैनिक 'पुढारी'च्या वृत्ताची दखल | चांदवड-मनमाड रस्त्यावर पथदीप बसवण्यास प्रारंभ

आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पथदीप बसवण्यासाठी उपलब्ध करून दिला निधी
चांदवड, नवीन पथदीप
चांदवड : शहरातील मनमाड महामार्गावर बसवण्यात आलेले नवीन पथदीप. (छाया : सुनील थोरे)
Published on
Updated on

चांदवड : शहरातील चांदवड – मनमाड रस्त्यावर पथदीप बसवले नसल्याने वारंवार अपघात घडत होते. या संदर्भात दैनिक 'पुढारी' ने सामाजिक बांधिलकी जोपासत 'चांदवड मनमाड रस्ता पथदीपअभावी असुरक्षित' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे चांदवड – मनमाड रस्त्यावर पथदीप बसवण्याचे काम सुरू झाल्याने समस्त चांदवडकरांनी दैनिक 'पुढारी'चे आभार व्यक्त केले आहे.

चांदवड -मनमाड रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होऊन कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. हा रस्ता शहराच्या मध्यभागातून गेला असल्याने या रस्त्यावर पथदीप बसवणे गरजेचे होते. मात्र, जालना येथील शेट्टी कन्स्ट्रक्शन कंपनीने २ वर्ष उलटले, मात्र अद्यापही रस्त्यावर पथदीप बसवले नव्हते. त्यामुळे महामार्गावर रात्री वारंवार अपघात घडत आहे. तसेच या रस्त्याला शहरातील इतर रस्ते जोडले असल्याने रस्त्यावर सतत वर्दळ असते. रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने वाहने भरधाव चालत असल्याने अंधारात या ठिकाणी अपघात घडतात. या संदर्भात दैनिक ‘पुढारी’ने १५ जून २०२४ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल आमदार डॉ. आहेर यांनी घेत तत्काळ आमदार निधी उपलब्ध करून पथदीप बसवण्याचे काम सुरू केले आहे.

Dainik Pudhari impact
दैनिक 'पुढारी' मध्ये प्रसिद्ध झालेली बातमीDainik Pudhari

या पथदीपमुळे रात्री चांदवड – मनमाड महामार्ग प्रकाशमान होणार असून वाहनधारकांना प्रवाशांचा अंदाज येण्यास मदत होऊन पर्यायाने महामार्गावरील अपघात सहज टाळता येणार आहेत. पथदीप बसवल्याप्रमाणे महामार्गाच्या दोन्ही बाजूने फूटपाथ तयार करणे बाकी आहे. ताेही लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news