

नाशिक : मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी रामवाडी परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी नागरिकांनी गिते यांचे जल्लोषात स्वागत केले. शिवसेना उपनेते सुनील बागूल यांनी उत्तर महाराष्ट्रातून वसंत गिते हे विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
गिते यांच्या प्रचारार्थ गोदा काठालगतच्या रामवाडी, हनुमानवाडी, आदर्शनगर, मोरे मळा परिसरातून शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात प्रचार यात्रा काढली. यावेळी उपनेते सुनील बागूल, प्रदेश संघटक व माजी महापौर विनायक पांडे तसेच श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागूल, महानगरप्रमुख मामा राजवाडे, बाळासाहेब पाठक, शंभू बागूल, गुलाब भोये, कैलास हेकरे, मनीषा हेकरे, कीर्ती दरगोडे, बाळासाहेब कोकणे, पप्पू टिळे, दिलीप मोरे, संजय थोरवे, रवि साठे, युवराज पेखळे, छोटू पाटील, युवराज जाधव आदींसह कार्यकर्ते, महिला उपस्थित होते. नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी तसेच महिलांनी औक्षण करत वसंत गिते यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बागूल म्हणाले की, वसंत गिते यांनी आजवर शहरासाठी केलेले काम सर्वांसमोर असून, शहराच्या विकासासाठी त्यांचे योगदान सर्वांना ज्ञात आहे. गिते यांच्या उमेदवारीला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून, हा प्रतिसाद मतदानाच्या रूपातून गिते यांच्या पारड्यात पडेल व ते विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास राजवाडे यांनी व्यक्त केला. गिते यांनी ४० वर्षे नाशिककरांची सेवा केली. त्यामुळे त्यांचा विजय केवळ औपचारिकता असून, मतदार स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शवत असल्याचे बाळासाहेब पाठक यांनी सांगितले. वसंत गिते यांचा सर्वाधिक मतांनी विजय होईल, असा विश्वास शंभू बागूल यांनी व्यक्त केला.