विधानसभेचा रणसंग्राम : दिंडोरीतील नेतृत्व चांदवडमध्ये रोवणार पाय?

Assembly Election 2024 | सहकार क्षेत्रातील नेत्याकडून पुष्टी
Assembly Election 2024 |  leader cartoon
जिल्ह्यातील साखर क्षेत्रात नावलाैकिक असलेले दिंडोरीमधील सर्वमान्य नेतृत्व चांदवडमध्ये पाय रोवण्यासाठी सज्ज होत आहे.File Photo
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील साखर क्षेत्रात नावलाैकिक असलेले दिंडोरीमधील सर्वमान्य नेतृत्व चांदवडमध्ये पाय रोवण्यासाठी सज्ज होत आहे. सहकार क्षेत्रातील एका बड्या नेत्याने त्यास पुष्टी दिली आहे. त्यामुळे निवडणुका घोषित होण्यापूर्वीच चांदवडमधील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.

ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकांचा बार उडणार आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी यादी असून, सर्वच जण तयारीला लागले आहेत. पण सरतेशेवटी तिकीट कोणाला मिळणार याचा सर्वस्वी निर्णय हा पक्षीयस्तरावर होणार आहे. त्यामुळे तूर्तास इच्छुक आपापल्या परीने गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत. निवडणुकीच्या या धामधुमीत दिंडोरीतील कारखान्याच्या माध्यमातून जिल्हाभरात सर्वदूर ख्याती असलेले एक बडे प्रस्थदेखील यंदा विधानसभेसाठी चांदवडमधून तुतारी फुंकण्याच्या तयारी असल्याची जोरदार चर्चा आहे.

दिंडोरी लाेकसभेच्या निवडणुकीत चांदवड मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य होते. पण, कादवाच्या काठावरील गावांनी हात दिल्यामुळे महाविकास आघाडीचे खा. भास्कर भगरे यांनी विजय संपादन केला. भगरे यांच्या विजयानंतर दिंडोरी लोकसभेअंतर्गत सहाही विधानसभा मतदारसंघांतून आघाडीकडे इच्छुकांचा राबता वाढला आहे. अशा परिस्थितीत भगरे यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या दिंडाेरीतील नेत्याने चांदवडचे नेतृत्व करावे, अशी गळ पक्षामधील सहकाऱ्यांकडू घातली जात आहे. स्थानिक पातळीवर तसा प्रचारदेखील सुरू केल्याचे चर्चा आहे. पण मतदारसंघात नेतृत्व असताना त्यांना वगळून बाहेरच्या नेतृत्वाला आघाडीकडून संधी दिली जाणार का? अन‌् उमेदवारी दिली तरीही चांदवड-देवळावासीय मतदारसंघाबाहेरील नेतृत्व स्वीकारणार हे लवकरच स्पष्ट होईल.

इच्छुकांमध्ये चलबिचल

महाविकास आघाडीत चांदवड मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. तर मित्रपक्ष राष्ट्रवादीकडूनही इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांमधील इच्छुकांनी लोकसभेपासून दोन ते तीन वेळेस मतदारसंघ पिंजून काढला आहे. अशावेळी तालुक्याबाहेरील आघाडीतील बड्या नेत्याचे नाव अचानक उमेदवारीसाठी पुढे येत असल्याने स्थानिक इच्छुकांमध्ये चलबिचल वाढीस लागली आहे.

बारा जागांवर दावा

राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्ह्यातील बारा जागांवर दावा सांगितला आहे. त्यात विद्यामान सहा जागांसह चांदवड, बागलाण, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नांदगाव, मालेगाव बाह्य या जागांसाठी आग्रही आहे. पक्षाच्या स्थानिक पातळीवरून प्रदेशस्तरावर याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे. नाशिक मध्यमधून माजी नगरसेवक गजानन शेलार यांच्यासह मविप्रचे सरचिटणीस इच्छुक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news