विधानसभा निवडणूक 2024 | विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन करा - एस. चोक्कलिंगम

Assembly Election 2024: एस. चोक्कलिंगम यांनी निवडणूक तयारीचा घेतला आढावा
Assembly Election 2024
नाशिक : विधानसभा निवडणूकीचा आढावा घेताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम. समवेत डॉ. प्रविण गेडाम.pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : लोकसभा निवडणुकीतील त्रुटींचा अभ्यास करून आगामी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम (State Chief Electoral Officer S. Chokkalingam) यांनी यंत्रणांना दिले आहेत.

नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयात गुरुवारी (दि.१८) जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तयारीचा चोक्कलिंगम यांनी आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अपर आयुक्त नीलेश सागर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपआयुक्त मंजिरी मनोलकर, सहायक आयुक्त विठ्ठल सोनवणे उपस्थित हाेते.

एस. चोक्कलिंगम म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मतदार यादी अचूक होण्यासाठी प्रयत्न करावे. १८-१९ वयोगटातील नवमतदारांसह महिला मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. तसेच आगामी विधानसभा निवडणूक कमीतकमी खर्चात कशी सक्षमतेने पार पाडता येईल, यासाठीदेखील नियोजन करण्यात यावे, असे निर्देश दिले. तसेच सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार निवडणुकीची कामे करावी. मतदार यादी, आवश्यक असलेल्या मतदान साहित्याचा आढावा, लोकसभा निवडणुकीच्या खर्चाचा आढावा व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक निधीचा आढावा घेण्यात आला. तसेच स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्राचाही चोक्कलिंगम यांनी आढावा घेतला. बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

मतदारयादी शुद्धीकरणासाठी सहकार्य करावे : शर्मा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मतदार यादीचे पुनरिक्षणाची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली आहे. मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन दुबार, मयत व स्थलांतरीत मतदारांची माहिती संकलित करत आहेत. तसेच नवमतदारांची नोंदणी करण्यात येत असून जिल्हावासीयांनी मतदार यादी शुद्धीकरणाचे कामकाजात प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मयत, विवाह होऊन सासरी गेलेले व रोजगारासाठी कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेले मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी कुटुंबाने तातडीने अर्ज क्रमांक 7 भरून व्यक्तींची नावे वगळणी करून घ्यावी. वगळणीसाठी विहित नमुना अर्ज क्र. 7 ऑनलाइन (Voter Service Portal- https://voters.eci.gov.in) देखील सादर करता येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 चे कलम 17 नुसार मतदारांना एकापेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात नाव नोंदणी करता येत नाही. कलम 18 नुसार मतदारांना एकाच विधानसभा मतदार संघात एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव नोंदविता येत नाही. ज्या मतदारांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव नोंदविले आहे, त्यांचेविरूद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 चे कलम 31 नुसार मतदार नोंदणी अर्ज करताना खोटी माहिती दिल्याबद्दल एक वर्षापर्यंत तुरूंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news