विधानसभा 2024 | 'एमआयएम'चा पतंग कापण्यासाठी विरोधक सज्ज!

मुस्लीमबहुल मालेगाव मध्यमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत द्वंद्व शक्य
मालेगाव मतदारसंघ
मालेगाव मतदारसंघpudhari news network
Published on
Updated on
मालेगाव : सादिक शेख

मुस्लीमबहुल मालेगाव मध्य मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. विकासाऐवजी धर्मकारण तसेच मुस्लीम समाजातील दखनी - मोमीन वादामुळे इथली निवडणूक नेहमीच राज्यभर चर्चेचा विषय होत आलेली आहे. यंत्रमागाचे शहर अशी ओळख असलेल्या या शहरात मध्य विधानसभा मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणूनही ओळखला जातो. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या मतदारसंघात अनेक इच्छुकांनी आतापासूनच कंबर कसली आहे.

Summary

2019 निवडणुकीतील मतदान

  • मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल : 1,17,242 (एमआयएम)

  • शेख आसीफ शेख रशीद : 78,723 (काँग्रेस)

  • दीपाली विवेक वारुळे : 1,450 (भाजप)

मालेगाव मध्य मतदारसंघ सध्या एमआयएमच्या ताब्यात आहे. हा मतदारसंघ पूर्वी जनता दलाचा बालेकिल्ला होता. येथे २5 वर्षे जनता दलाचे दिवंगत नेते निहाल अहमद याचस्व गाजविले. त्यानंतर तत्कालीन काँग्रेस दिवंगत नेते शेख रशीद यांनी निहाल अहमद यांचा पराभव केला. २009 मध्ये मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत जनसुराज्य शक्तीतर्फे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे निवडून आले. २0१4 मध्ये त्यांचा पराभव काँग्रेसचे आसिफ शेख यांनी केला. २0१9 मध्ये पुन्हा मौलाना इस्माईल यांनी एमआयएमतर्फे उमेदवारी करत शेख यांचा पराभव केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना व राष्ट्रवादीत पडलेले गट यामुळे आघाडीतील प्रत्येक पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. २0१9 मध्ये इस्माईल यांना जनता दलाचे मुस्तकीम डिग्निटी व शान-ए-हिंद यांनी पाठिंबा दिला होता. परंतु गेल्यावर्षी डिग्निटी शान-ए-हिंद यांनी जनता दलाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), समाजवादी पक्ष असे पक्ष आहेत. यात यापूर्वी मालेगाव मध्यची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला जागा मिळणार नसल्याचे पाहात राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) शहराध्यक्ष व माजी आ. शेख आसीफ यांनीही आघाडीच्या घटक पक्षांतील इच्छुकांची गर्दी लक्षात घेत पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आ. शेख यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आठवडाभरातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालेगावी येत त्यांची भेट घेतली. मात्र, शेख अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या मालेगावमध्ये माजी आ. शेख रशीद व शेख आसीफ यांनी महापालिकेवरही काँग्रेसचा झेंडा फडकाविला होता. मात्र, नंतर शेख पिता-पुत्रांनी काँग्रेस सोडली. आता माजी नगरसेवक एजाज बेग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना उमरैन महेफुज रहेमानी हेदेखील उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे.

समाजवादीकडून १२ जागांची मागणी

समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी राज्यात १२ जागांची मागणी करत मालेगाव मध्यवर दावा सांगितला आहे. समाजवादीत माजी मंत्री स्व. निहाल अहमद यांची कन्या शान-ए-हिंद याही विधानसभेसाठी तयारी करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news