Exam Privacy Chair Design | परीक्षा गोपनीयता खुर्चीला डिझाइन पेटंट

Exam Privacy Chair Design | पारेगावच्या शिक्षिका डॉ. हेमवती कुन्हाडे यांच्या रचनेची दखल राष्ट्रीय स्तरावर
Exam Privacy Chair Design
Exam Privacy Chair Design
Published on: 
Updated on: 

येवला : पुढारी वृत्तसेवा

परीक्षागृहात विद्यार्थ्यांची गोपनीयता, एकाग्रता आणि शिस्त कायम राहावी, या उद्देशाने येथील रहिवासी व पारेगाव (ता. चांदवड) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या शिक्षिका डॉ. हेमवती कुन्हाडे यांनी विकसित केलेल्या 'परीक्षा गोपनीयता खुर्ची' या अभिनव डिझाइनला पेटंटची मान्यता मिळाली.

Exam Privacy Chair Design
Nashik Rainfall Deficit | इगतपुरीत पाऊस घटल्यामुळे जिल्ह्यात २१ टक्के तूट; पिके संकटात येवला, मालेगाव, नांदगावमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती

परीक्षा गोपनीयता खुर्ची हे केवळ पारंपरिक खुर्चीचे स्वरूप नसून, परीक्षेच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेली स्वतंत्र आसनरचना आहे. विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका सोडविताना स्वतंत्र कार्यक्षेत्र मिळावे, शेजारील विद्यार्थ्यांमुळे होणारे लक्ष विचलन कमी व्हावे आणि परीक्षेवेळी आवश्यक वैयक्तिक गोपनीयता राखली जावी, या उद्देशाने या डिझाइनची संकल्पना केली आहे.

संकल्पनेच्या दृश्य स्वरूपातील वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनला बौद्धिक संपदा संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे या खुर्चीची संकल्पना प्रत्यक्ष परीक्षेच्या वातावरणातील गरज लक्षात घेऊन विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण आसनरचनेच्या स्वरूपात अधोरेखित झाली आहे.

Exam Privacy Chair Design
Nashik Accident Death | येवला उपजिल्हा रुग्णालयासमोर भीषण अपघात; भरधाव डम्परच्या धडकेत कोपरगावच्या दोघांचा जागीच मृत्यू

पारंपरिक बाक-खुर्चीपेक्षा विद्यार्थ्याला अधिक स्वतंत्र जागा आणि गोपनीय वातावरण देणे, हा या डिझाइनचा केंद्रबिंदू आहे. डिझाइन पेटंटची मान्यता ही या उत्पादनाच्या दृश्य रचना व डिझाइनच्या नाविन्यपूर्णतेला मिळालेली बौद्धिक संपदा मान्यता म्हणून महत्त्वाची आहे. त्यामुळे या संकल्पनेला केवळ शैक्षणिक उपक्रम न राहता, पेटंट माध्यमातून औपचारिक बौद्धिक संपदा संरक्षण मिळाले आहे.

पेटंटपर्यंतचा प्रवास:

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होणे, शेजारील विद्यार्थ्यांकडे अनावश्यक दृष्टिसंपर्क होणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कार्यक्षेत्राची गरज भासणे, या समस्या डॉ. कुन्हाडे यांनी अध्यापनादरम्यान अनुभवल्या. त्यावर पारंपरिक उपायांपेक्षा वेगळा विचार करत त्यांनी या खुर्चीची संकल्पना विकसित केली.

शाळेतील प्रत्यक्ष समस्येपासून सुरू झालेला हा प्रयोग पुढे नाविन्यपूर्ण डिझाइन निर्मितीपर्यंत आणि त्यानंतर डिझाइन पेटंटच्या मान्यतेपर्यंत पोहोचला. या उपक्रमासाठी बाभूळगाव येथील एसएनडी तंत्रनिकेतनच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे संदीप आसुदे, किरण खोकले, संतोष माकुणे, नवनाथ बोलीज, अमोल बर्डे, मोईन शेख आणि साईप्रसाद शिंदे यांचे सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news