Ashok Kharat case | खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सहाव्या गुन्ह्यात आज पुन्हा ताबा
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. न्यायालयाने पाचव्या गुन्ह्यात खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, यामुळे त्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. यापूर्वी तो पोलिस कोठडीत होता; मात्र तपासादरम्यान समोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Case
Construction Material Price Hike Nashik| बांधकाम साहित्य दरात वाढ : नाशिकमध्ये गृहस्वप्नपूर्ती झाली अवघड

महत्त्व या प्रकरणात विविध गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, पाचव्या गुन्ह्याच्या सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आला. तपास यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यांना न्यायालयाने दिल्याचेही समजते. दरम्यान, खरातविरोधात दाखल असलेल्या सहाव्या गुन्ह्यात गुरुवारी (दि.२३) पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे. या गुन्ह्यातही फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे आणि महिलांशी संबंधित गंभीर आरोपांचा समावेश असल्याने तपास अधिकच व्यापक होत चालला आहे.

सदर प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून बनावट उपचार, गर्भपातासंदर्भातील आरोप, अनुयायांची आर्थिक फसवणूक तसेच अंधश्रद्धा पसरवून लोकांची दिशाभूल केल्याचे गंभीर मुद्दे समोर येत आहेत. या सर्व बाबींवर पोलिस आणि विशेष तपास पथक कसून तपास करत आहेत. तपासादरम्यान काही डॉक्टर तसेच स्थानिक पातळीवरील व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

Ashok Kharat Case
Jal Yatra Maharashtra | त्र्यंबकेश्वरला गोदा-नर्मदा जलयात्रेला उद्या प्रारंभ

दरम्यान, सहाव्या गुन्ह्यात ताबा घेतल्यानंतर खरातकडून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला असून, आगामी काही दिवसांत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, पीडितांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news