Ashok Kharat case - खरातला सिद्धपुरुष म्हणणारा नामकर्ण आवारे अटकेत

Ashok Kharat case-जगदंबा पतसंस्थेतील ३२ बनावट खात्यांत सहभाग
Ashok Kharat case
Ashok Kharat casePudhari photo
Published on
Updated on

Namkaran Aware arrested in Ashok Kharat case

नाशिक : भोंदू अशोक खरात याचा निकटवर्तीय सहकारी तसेच उद्योजक नामकर्ण आवारे यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. श्री जगदंबा बिगरशेती सहकारी पतसंस्थेमधील बनावट ३२ खात्यांच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग निष्पन्न झाल्याने आवारे याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Ashok Kharat case
Ashok Kharat case |खरात प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात, SIT कडून १०५ हून अधिक साक्षीदारांची चौकशी

नामकर्ण आवारे हा खरातच्या शिवलिका संस्थांचे विश्वस्त म्हणून कार्यरत होता. अशोक खरातला १८ मार्च रोजी अटक झाल्यानंतर आवारे याच्या चौकशीची चर्चा सुरू होती. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने खरातच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आणि पतसंस्थेतील गैरप्रकारांमध्ये त्याचाही सहभाग असल्याचा संशय अधिक गडद झाला.

जगदंबा पतसंस्थेमध्ये अशोक खरातच्या नावाने तब्बल ३२ खाती असल्याचे तपासात उघड झाले. या खात्यांमधून मोठ्या आर्थिक उलाढालीचा संशय असून, त्याचा तपास सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिर्डी आणि सिन्नर पोलिसांकडून आवारे याची कसून चौकशी करण्यात येत आहे. आर्थिक व्यवहार, पतसंस्थेतील कागदपत्रे, विश्वस्त मंडळातील निर्णय आणि खरातशी असलेले संबंध याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. काही व्यवहारांबाबत अतिरिक्त कागदपत्रांची मागणीही करण्यात आल्याचे समजते.

Ashok Kharat case
NEET paper leak case Nashik | नीट' पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण, शुभम खैरनारच्या फ्लॅटची तपासणी

पुस्तक तपासाच्या केंद्रस्थानी

आवारेने त्याच्या 'असा मी नामकर्ण' या आत्मचरित्रामध्ये अशोक खरातवर तब्बल १३ पाने लिहून त्याला सिद्धपुरुष अशी पदवी दिली होती. या पुस्तकातील 'सिद्ध पुरुषांच्या सहवासात' या प्रकरणात खरातच्या कथित चमत्कारांचे, भविष्यवाण्यांचे आणि प्रभावाचे गौरवपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. आता याच पुस्तकातील उल्लेख आणि दावे तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news