Shirdi Accident: अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू; पत्नीची मदतीसाठी आर्त हाक.. क्रेन पोहोचायला विलंब

Jitendra Shelke Death: शिवनिका ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष तथा शिर्डी येथील उद्योजक जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Ashok Kharat Jitendra Shelke Death
Ashok Kharat Jitendra Shelke Deathpudhari
Published on
Updated on

Jitendra Shelke Death samruddhi mahamarg accident

शिर्डी : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असताना शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष तथा शिर्डी येथील उद्योजक जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सुजित शेळके गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Ashok Kharat Jitendra Shelke Death
Ashok Kharat Case : अबब! भोंदू खरातची संपत्ती दोन हजार कोटींच्या घरात

शेळके कुटुंबीय संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवार परिसरात दुपारी सुमारे सव्वा बाराच्या सुमारास त्यांच्या कारची कंटेनरला मागून जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की महामार्गालगत राहणारे धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण व स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून गेले.

Ashok Kharat Jitendra Shelke Death
Ashok Kharat Case: अशोक खरातचे तपासात असहकार्य, वकिलांची न्यायालयात माहिती; पोलिस कोठडीत वाढ

घटनास्थळी पोहोचल्यावर कार पूर्णपणे कंटेनरच्या खाली अडकलेली दिसून आली. ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत गाडीच्या मागील सीटवर अडकलेल्या मुलाला बाहेर काढले. जखमी अवस्थेत असतानाही मुलाने वडिलांचे नाव सांगितल्याने अपघातातील व्यक्तींची ओळख पटली. ग्रामस्थांनी तत्काळ जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले तसेच पोलिस, महामार्ग प्रशासन आणि शिर्डीतील शेळके कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

Ashok Kharat Jitendra Shelke Death
Ashok Kharat Case | पंचवटीतील 'त्या' बड्या डॉक्टरचे भोंदू बाबाशी काय कनेक्शन? लैंगिक शोषणात वैद्यकीय मदतीचा संशय

सरपंच प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, मुलाला बाहेर काढत असताना पुढील सीटवर अडकलेल्या अनुराधा शेळके मदतीसाठी आर्त हाक देत होत्या; मात्र वाहन कंटेनरखाली पूर्णपणे अडकल्याने त्यांना तत्काळ बाहेर काढणे शक्य झाले नाही. अपघात दुपारी घडला असला तरी वाहन बाहेर काढण्यासाठी क्रेन सुमारे दोन वाजता घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

क्रेन घटनास्थळी पोहोचल्याने बचावकार्याला विलंब झाला. वेळेत मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचू शकला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

जखमी सुजित शेळके याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातानंतर समृद्धी महामार्गावर मोठी गर्दी जमली होती. श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व माहिती घेतली.

जितेंद्र शेळके हे ‘शिवनिका ट्रस्ट’चे सर्वेसर्वा अशोक खरात यांचे निकटवर्तीय मानले जात होते. गेल्या काही दिवसांपासून खरात यांच्या अटकेमुळे ते मानसिक तणावाखाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news