Ashok Kharat Case Nashik | खरात प्रकरणात दोन महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा

Ashok Kharat Case Nashik | खरात बहुचर्चित अशोक प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे समोर येत असून, आता दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत.
Eight officers in the Jalna police force have been promoted
जालना पोलिस दलातील ८ अंमलदारांना पदोन्नतीPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खरात बहुचर्चित अशोक प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे समोर येत असून, आता दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत. यापूर्वी एका आमदाराच्या पत्नीचा तसेच एका महिला आयएएस अधिकाऱ्याचा संदर्भसमोर आल्यानंतर आता पोलिस विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवरही संशय व्यक्त होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Eight officers in the Jalna police force have been promoted
Nashik Ashok Kharat Case| भोंदू खरात प्रकरणात 12 गुन्ह्यांची नोंद; एसआयटीने 4,650 व्हिडिओ हटवले

आवडत्या पोस्टिंग सूत्रांच्या माहितीनुसार, एक डीसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाच्या महिला अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांनी ठिकाणी मिळवण्यासाठी खरातशी संपर्क साधला होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात काही आर्थिक व्यवहार झाले असल्याची शक्यताही वर्तवली जात असून, याबाबत सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. यातील एक महिला अधिकारी पूर्वी नाशिक ग्रामीणमध्ये कार्यरत होती, अशीही माहिती समोर येत आहे.

Eight officers in the Jalna police force have been promoted
Ashok Kharat Nashik Case | मोठा खुलासा! भोंदू खरात निघाला जहाजावरील साधा चतुर्थश्रेणी कर्मचारी

त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गंभीर व व्यापक होण्याची चिन्हे आहेत. पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित नावे समोर येत असल्यामुळे या प्रकरणाकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे.

दरम्यान, अधिकृतरीत्या कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नसले, तरी सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार तपास यंत्रणा या सर्व बाबींची पडताळणी करत आहे. अशोक खरात प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news