

नाशिक : भोंदू खरातचा दिवसागणिक पाय खोलात जाताना दिसत आहे. खरातला रविवारी पाचव्या गुन्ह्यात न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भोंदू खरातचा मोबाइल डेटा रिकव्हर करण्यात सायबर टीमला यश आल्याने, खरातची डोकेदुखी वाढली.
खरातने महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच अनेक व्यावासयिकाही गंडविले आहे. जमिनी हडपल्या आहेत. खरातवर १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, त्यातील आठ गुन्हे महिलांच्या शोषणाबद्दल आहेत. दरम्यान, मोबाइलमध्ये असलेला डेटा या सर्व प्रकरणात महत्त्वाचा ठरणार असल्याने, डेटा हस्तगत करण्याचे काम सुरू होते. आता डेटा रिकव्हर करण्यात सायबर टीमला यश आले असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. खरातच्या संपर्कात अनेक बहे राजकारणी असल्याने, त्यांच्याबाबतची काही माहिती मोबाइलमध्ये आहे काय? याचा देखील शोध घेतला जात आहे.
पेनकिलर खाऊनही डोकेदुखी थांबेना!
देवाचा अवतार असल्याचे सांगणारा भोंदू खरात सध्या डोक्याच्या दुखण्याने ग्रस्त असल्याची बाब त्याच्या वकिलाने न्यायालयासमोर आणली आहे. खरातच्या वकिलांनी सांगितले की, खरातच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तसेच त्याचे डोकेही दुखत आहे. दुखणे थांबावे, खांद्याला आराम मिळावा म्हणून त्याने पेनकिलर गोळ्या, तसेच औषधे मेतली. परंतु त्यामुळेशी फारसा फरक पडलेला नाही. अशात खरातला न्यूरोसर्जनकडे घेऊन जाऊ देण्यास परवानगी द्यावी. त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती खरातच्या वकिलांनी केली. त्यावर न्यायाधीशांनी पोलिसांना खरातच्या वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे तपासणीच्या सूचना दिल्या राजकारण्यांचे नंबर सेव्ह केले असल्याचे समोर आले होते, आता नव्याने हाती लागलेल्या डेटामधून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.