

नाशिक : नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक रिंगणातील 106 माजी नगरसेवकांपैकी 52 माजी नगरसेवकांना नाशिककरांनी घरी बसवले. 55 माजी नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. यात भाजपच्या 30 माजी, तर शिवसेनेच्या (शिंदे गट) 15 माजी नगरसेवकांना महापालिकेत पुन्हा एन्ट्री मिळाली आहे.
या निवडणुकीत भाजपचे अरुण पवार, सुनीता कोठुळे, कल्पना चुंभळे, योगेश हिरे, शिवाजी गांगुर्डे, संभाजी मोरुस्कर, अर्चना थोरात, कुणाल वाघ, दिनकर आढाव, शिवसेनेचे गणेश चव्हाण, सूर्यकांत लवटे, कविता कर्डक, अनिल मटाले, पंडित आवारे, दामोदर मानकर, सीमा निगळ, नंदू जाधव, नयना गांगुर्डे, सुमन सोनवणे, अपक्ष अशोक मुर्तडक, शशिकांत जाधव, पूनम सोनवणे, रुची कुंभारकर, सुमन ओहोळ, सुषमा पगारे, मेघा साळवे, सचिन जाधव, मीरा हांडगे, भाग्यश्री ढोमसे, दिलीप दातीर, उबाठाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, रिमा भोगे, सीमा बडदे, मनीषा हेकरे, संजय चव्हाण, अर्चना जाधव, गुलजार कोकणी, वंदना मनचंदा, माकपच्या वसुधा कराड, ॲड. तानाजी जायभावे, सचिन भोर, बसपाचे अरुण काळे, मनसेचे सलीम शेख, सुदाम कोंबडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय साबळे, समीना मेमन, राष्ट्रवादीचे सतीश सोनवणे, शबाना पठाण, शोभा आवारे, काँग्रेसचे रमेश जाधव, लक्ष्मण जायभावे यांना पराभव पत्करावा लागला.
माजी नगरसेवकांना विजयश्री
रंजना भानसी, प्रियंका माने, मच्छिंद्र सानप, सरिता सोनवणे, हेमंत शेट्टी, कमलेश बोडके, गुरुमित बग्गा, सुरेश पाटील, हिमगौरी आहेर, स्वाती भामरे, अजय बोरस्ते, उषा बेंडकोळी, विलास शिंदे, दिनकर पाटील, इंदूबाई नागरे, माधुरी बोलकर, डॉ. हेमलता पाटील, समीर कांबळे, शाहू खैरे, सुफियान जीन, प्रथमेश गिते, सचिन मराठे, राहुल दिवे, आशा तडवी, प्रशांत दिवे, मंगला आढाव, शैलेंद्र ढगे, शरद मोरे, रंजना बोराडे, विशाल संगमनेरे, भारती ताजनपुरे, सीमा ताजणे, जयश्री गायकवाड, ॲड. कोमल मेहरोलिया, रमेश धोंगडे, वैशाली दाणी, केशव पोरजे, रूपाली निकुळे, चंद्रकांत खोडे, प्रवीण तिदमे, राजेंद्र महाले, सुधाकर बडगुजर, हर्षदा गायकर, भागवत आरोटे, किरण गामणे, दीपक दातीर, प्रतिभा पवार, सुवर्णा मटाले, मुकेश शहाणे, छाया देवांग, ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, दीपाली कुलकर्णी, अजिंक्य साने या माजी नगरसेवकांना नाशिककरांनी पुन्हा महापालिकेत एन्ट्री दिली.