

देवळाली कॅम्प (नाशिक) : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरला निघालेल्या श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीने नाशिक तालुक्यातील पळसे गावातील मुक्कामानंतर सकाळी सिन्नरकडे प्रस्थान केले.
यावेळी पळसे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पालखीचे मनोभावे दर्शन घेत आमदार सरोज आहिरे यांनी वारकऱ्यांसमवेत तुळशी वृंदावन डोक्यावर घेत दोन किलोमीटर पायी वारी केली. संपूर्ण शिंदे पळसे परिसरातील भाविक सकाळी दर्शनास आल्याने परिसर वारीमय झाला होता. विठूनामाचा गजर, टाळ- मृदंगाचा आवाज, भक्तिभावाने हरिनामाचा गजर करत निघालेले वारकरी बघून प्रत्येक जण नतमस्तक होत होता.