.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
A procession will be taken out within Nashik city limits to mark the birth anniversary of Sahitya Ratna Annabhau Sathe.
नाशिक : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त नाशिक शहर हद्दीत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.1) मिरवणूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
महात्मा फुले पोलीस चौकी, हॉटेल शिरसाठ, चौक मंडई, हाजी टी पॉईंट, महात्मा फुले मार्केट, दुध बाजार (अब्दुल हमीद चौक), भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल, परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नेपाळी कॉर्नर, शालीमार चौक, खडकाळी सिग्नल मार्गे, लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा चौक अशी मिरवणूक निघणार आहे.
या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होणार असल्याने वाहतुककोंडी होऊ नये म्हणून मिरवणूक मार्ग तसेच अण्णाभाऊ साठे चौक ते साईबाबा हॉस्पिटल ते शिवसेना भवन (कालीदास कलामंदिरासमोरील मार्ग) हा मार्ग वाहतुकीसाठी सकाळी 10 पासून मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. या वेळेत पंचवटी डेपो क्रमांक 2, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा येथून सुटणार्या बसेस पंचवटी डेपोतून सुटतील व जुना आडगाव नाका संतोष टी पॉईंट द्वारका मार्गे जातील.
ओझर दिंडोरी पेठ येथून येणार्या सर्व बसेस आडगावनाका कन्नमवारपुल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड नाशिक शहराकडे रवाना होतील. द्वारका सर्कलकडून पंचवटीकडे जाणारी वाहने कन्नमवार पुलावरुन जातील. द्वारका सर्कलकडून नाशिक शहरामध्ये येणार्या बसेस सारडा सर्कल-गडकरी सिग्नल सीबीएसमार्गे जातील, याची नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.