Nashik Accident News | मुंबई-आग्रा महामार्गावरील एसटी बसची चारचाकीला धडक

चिंचवे गावाजवळ चौफुलीवर भीषण अपघात; सुदैवाने जिवितहानी नाही
नाशिक देवळा
देवळा : मुंबई आग्रा महामार्गावरील चिंचवे गावाजवळ झालेल्या अपघातात कार व एसटी बसचे झालेले नुकसान (छाया ; सोमनाथ जगताप )
Published on
Updated on

देवळा: मुंबई आग्रा महामार्गावरील चिंचवे गावाजवळ चौफुलीवर सोमवारी (दि.१५) रोजी दुपारी ११ वाजेच्या दरम्यान नाशिकहून मालेगावकडे जात असलेली एसटी बसने (क्रमांक MH13 CU.6851) पुढे जात असलेल्या मारुती सुझुकी (क्रंमाक MH.04 EX.6730) या चारचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. अपघातात चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिककडून मालेगावकडे जात असलेल्या महामार्गावरील चिंचवे गावाजवळ हा आपघात झाला असून याठिकाणी तीव्र उतार असल्याने वाहनाच्या वेगाने नियंत्रण नसल्याने वारंवार अपघाआच्या घटना घडत आहेत. याठिकाणी गतिरोधकवर झेब्रा क्रॉसिंग अन्य उपाययोजना नसल्याने चिंचवे ग्रामस्थांनी बांधकाम विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अपघातात चारचाकी चक्काचूर झाली असून बस मधील प्रवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. प्रसंगावधान राखत बसचालकाने बस महामार्गावरील सर्व्हिस रोडवर थांबवली. त्यामुळे बसमधील ५० ते ५५ प्रवाशी सुदैवाने थोडक्यात बचावले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. वाहनचालक बेदरकारपणे स्पिड ब्रेकरवर व उतारवर वेगावर नियंत्रण ठेवत नसल्याने प्रवाशांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सदर ठिकाण हे अपघातप्रवण स्थळ म्हणून ओळखले जात असून वारंवार अपघात होत असल्याने काहींना जीव गमवावा लागत आहे. या अपघात क्षेत्राच्या जागेवर संबंधित विभागाने योग्य ती उपाय योजना करावी अन्यथा चिंचवे गावाच्या वतीने भविष्यात मोठे अंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी येऊ शकते.

घटनास्थळी सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी अपघात ग्रस्त बस मधील प्रवाशांना पुढील प्रवासासाठी वेळीच मदत केली. या अपघाताबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news